Cyber Crime : राजकुमार रावच्या पॅनकार्डचा गैरवापर, कर्जही घेतलं, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती…
अभिनेता राजकुमार रावची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे

मुंबई : अलिकडच्या काळात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येत मोठी वाढ होत आहे. अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येतोय. याला बॉलिवूडमधील कलाकारही अपवाद नाहीत. कारण बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची (RajKummar Rao) फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. राजकुमारच्या पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या पॅनकार्डचा गैरवापर करून त्याच्या नावावर कर्जही काढण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकाराची राजकुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. या ट्विटमध्ये “कुणीतरी माझ्या पॅन कार्डचा (Pan Card) गैरवापर केला आहे. पॅनकार्डच्या आधारे माझ्या नावावर अडीच हजार रुपयांचं कर्जही घेतलंय. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे”, असं राजकुमार म्हणाला आहे. शिवाय “या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी आणि यापुढे असं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी”, असं राजकुमार म्हणाला आहे.
राजकुमारचं ट्विट
अभिनेता राजकुमार रावची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. या ट्विटमध्ये “कुणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे. पॅनकार्डच्या आधारे माझ्या नावावर अडीच हजार रुपयांचं कर्जही घेतलंय. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे”, असं राजकुमार म्हणाला आहे. शिवाय “या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी आणि यापुढे असं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी”, असं राजकुमार म्हणाला आहे.
राजकुमार रावचं हे ट्विट सध्या लोशल मीडियावर व्हायरल होतंय. या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत याला दुजोरा दिला आहे. आपल्यासोबतही असा प्राकार घडला असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. तर राजकुमारच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
राजकुमार रावचा नुकताच ‘बधाई दो’ हा चित्रपट रिलीज झाला. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकरही दिसली होती. या आधी शादी में जरूर आना, रूही, स्त्री या सारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर मोनिका, गन्स अँड रोजेस हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. याशिवाय राजकुमारने भूषण कुमारचाही एक चित्रपट साईन केला आहे. त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या