AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास

अभिनेता सागर कारंडेने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला.

Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास
अभिनेता सागर कारंडेचा लोकल प्रवासImage Credit source: सागर कारंडे इन्स्टाग्राम
| Updated on: Apr 02, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई : कलाकार मंडळी म्हटलं की त्याचा एक वेगळा रूबाब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण काही अभिनेते-अभिनेत्री या सगळ्या कल्पनांना छेद देल साधं राहाणं पसंत करतात. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) सध्या त्याच्या अश्याच साधेपणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतंच नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ (Hich tar Familychi Ganmat Ahe) या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने (Mumbai Local) प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय.

सागरची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेता सागर कारंडेने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याला त्याने “नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकलने प्रवास…”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोला 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर तुझ्यातला साधेपणा आवडला असं अनेकांनी कमेंट करत सांगितलं आहे. एकाने सागरला तुला गर्दीत चढता आलं का? असा प्रश्न विचारला. तर दुसऱ्याने सागर तु मास्क लावल्यानं तुला ट्रेनमध्ये कुणी ओळखलं नाही, अशी कमेंट केली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अभिनयकौशल्यासोबतच त्याच्या साधेपणाची खूप चर्चा असते. बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर पैसा आणि प्रसिद्धी ओघाने आलंच. हे सर्व असूनही नवाजुद्दीनही काही दिवसांआधी मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसला होता. मीरा रोड या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग होत असून नवाजला तिथून एका कार्यक्रमात पोहोचायचं होतं. अशा वेळी आपली कोणतीही आलिशान गाडी न वापरता नवाजने मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला.

संबंधित बातम्या

My Dad’s Wedding : सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट…

will smith: ‘थप्पड की गुंज’चे परिणाम! अखेर अभिनेता विल स्मिथचा ॲकडमीचा राजीनामा

“मला स्टारची गरज नाही”, The Kashmir File चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा कंगना रनौतला चित्रपटात घेण्यास नकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.