AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफेअरच्या आरोपांदरम्यान थेट मॅचिंग कपडे घालून अभिनेत्रीसोबत लग्नात पोहोचला सुपरस्टार; व्हिडीओ व्हायरल होताच पत्नीचा मोठा निर्णय

Thalapathy Vijay Divorce: साऊथ सुपरस्टार थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. या चर्चांदरम्यान तो अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत एका लग्नसोहळ्यात पोहोचला होता. त्यानंतर पत्नीने कोर्टात विशेष मागणी केली आहे.

अफेअरच्या आरोपांदरम्यान थेट मॅचिंग कपडे घालून अभिनेत्रीसोबत लग्नात पोहोचला सुपरस्टार; व्हिडीओ व्हायरल होताच पत्नीचा मोठा निर्णय
थलपती विजय, संगीता आणि तृषा कृष्णनImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 9:40 AM
Share

साऊथ सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. यानंतर विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांनी एकत्र एका लग्नसोहळ्याचा हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला दोघं एकाच गाडीतून आले होते आणि जातानाही एकाच गाडीतून देले. इतकंच नव्हे तर यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. या दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विजयच्या पत्नीने चेन्नई उच्च न्यायालयात घरासंदर्भात एक अर्ज दिल्याचं समजतंय.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयीन कागदरपत्रांवरून असं दिसून येतंय की संगीताने 2026 च्या सुरुवातीला चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोट आणि अंतरिम निवास हक्क मिळविण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, संगीताला ती नेहमीपासून राहत असलेल्या घरातच घटस्फोटानंतरही राहायचं आहे. यासाठी तिने न्यायालयाकडे विनंती केली आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत आणि प्रतिज्ञापत्रात, 48 वर्षीय संगीताने म्हटलंय की विजयसोबत लग्न केल्यानंतर गेल्या 26 वर्षांपासून ती त्याच्या राहणीमानानुसार त्याच्यासोबत राहतेय. “मी एक कर्तव्यनिष्ठ गृहिणी आहे घर सांभाळण्यात, जेसन संजय आणि दिव्या साशा या दोन मुलांच्या संगोपनात, विजयची काळजी घेण्यात मी स्वत:ला झोकून दिलं आहे. कोर्टाची पायरी चढण्याआधी मी माझे वैवाहिक वाद शांततेने सोडवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. विजयने त्याच्या वकिलामार्फत सूचित केलंय की जर मी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा मार्ग अवलंबला तर मला माझ्या वैवाहिक घरात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्या माझ्याकडे पर्यायी निवासस्थान नाही. त्यामुळे मुख्य याचिकेवर निर्णय होईपर्यंत मला उपलब्ध असलेल्या सर्व हक्क आणि सुविधांसह नीलंकराई घरात राहण्याची परवानगी द्यावी”, अशी मागणी तिने केली आहे.

दुसरीकडे थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. विजय त्याच्या पहिल्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना त्याच्या वैवाहिक आयुष्याने अधिक लक्ष वेधलं आहे. संगीता सोरनलिंगमने 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात विजयशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत तिने असाही दावा केला आहे की विजयने तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि आर्थिक सुरक्षेवर मर्यादा आणल्या आहेत. संगीतानेही याचिकेत असंही म्हटलं आहे की ज्या अभिनेत्रीसोबत विजयचे विवाहबाह्य संबंध आहेत, ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर सतत आपले फोटो पोस्ट करत होती. यामुळे तिला आणि मुलांना सातत्याने अपमान सहन करावा लागला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!