KL Rahul-Athiya Shetty | अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या शाही विवाह सोहळ्यातील खास फोटो समोर, पाहा अभिनेत्रीचा राॅयल लूक

| Updated on: Jan 23, 2023 | 10:01 PM

आज शेवटी अथिया आणि केएल राहुल यांचा शाही विवाह सोहळा पार पडलाय. अत्यंत खासगी पध्दतीने यांचे लग्न खंडाळ्यामध्ये पार पडले आहे.

KL Rahul-Athiya Shetty | अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या शाही विवाह सोहळ्यातील खास फोटो समोर, पाहा अभिनेत्रीचा राॅयल लूक
Kl Rahul-Aathiya shetty
Follow us on

मुंबई : अखेर अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) याच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज दुपारपासूनच अथिया आणि केएल राहुल यांचे चाहते यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता यांच्या लग्नातील काही खास फोटो (Photo) पुढे आले आहेत. फोटोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांचाही लूक एकदम जबरदस्त दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करत होते. सतत यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आज शेवटी अथिया आणि केएल राहुल यांचा शाही विवाह सोहळा पार पडलाय. अत्यंत खासगी पध्दतीने यांचे लग्न खंडाळ्यामध्ये पार पडले आहे. खास पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.

काही वेळापूर्वीच अभिनेता सुनिल शेट्टी याने पैपराजी यांना मिठाई वाटत लग्न अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पडल्याचे सांगितले होते. इतकेच नाहीतर मला एक सासरा म्हणून राहायचे नाहीतर एक वडील म्हणून राहायचे असल्याचे सुनिल शेट्टी यांनी म्हटले होते.

सुनिल शेट्टी यांचे जे फोटो व्हायरल झाले होते, त्यामध्ये त्यांनी शेरवाणी घातल्याचे दिसत होते. सुनिल शेट्टी यांच्या फोटोनंतर चाहते अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहात होते.

सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नानंतर मोठा एक जंगी कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडणार असल्याची देखील चर्चा आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी विवाह सोहळ्यामध्ये गुलाबी रंगाचे आउट्फिट घातल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. रिपोर्टनुसार आज रात्रभर फार्महाऊसवर पार्टी चालणार आहे. यामध्ये खास पाहुणे देखील सहभागी होतील.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाला बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी देखील हजेरी लावली आहे. यासोबत केएल राहुल याचे काही जवळचे मित्र देखील या सोहळ्यात उपस्थित होते.

एम एस धोनी, विराट कोहली, अनुष्का शर्मा, सलमान खान, ईशांत शर्मा, कृष्णा श्रॉफ, अंशुला कपूर यांनीही हजेरी लावली होती. आता अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.