अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी घेतले सात फेरे, सुनिल शेट्टी म्हणाले एक वडील…

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 7:18 PM

या विवाह सोहळ्याला बाॅलिवूडच्या अनेक स्टारर्स हजेरी लावली होती. विराट कोहली याच्यापासून ते ईशांत शर्मा हे देखील लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी घेतले सात फेरे, सुनिल शेट्टी म्हणाले एक वडील...
Athiya Shetty and KL Rahuls wedding

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांनी आज लग्नगाठ बांधलीये. गेल्या काही दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल हे एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर केएल राहुल याच्या मॅचसाठी अथिया शेट्टी आणि सुनिल शेट्टी कायमच हजेरी लावायचे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लग्नाची (Wedding) आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आज खंडाळ्यामध्ये यांनी सात फेरे घेतले आहेत. अत्यंत राॅयल पध्दतीने अथिया आणि केएल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडलाय. रिपोर्टनुसार दुपारी तीन वाजता यांचे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याला बाॅलिवूडच्या अनेक स्टारर्स हजेरी लावली होती. विराट कोहली याच्यापासून ते ईशांत शर्मा हे देखील लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे लग्न पार पडल्यानंतर सुनिल शेट्टी हे पैपराजी यांना भेटण्यासाठी खास बाहेर आले होते. यावेळी सुनिल शेट्टी म्हणाले की, मला केएल राहुल याच्यासोबत एका सासऱ्यासारखे वागायचे नसून एका वडिलांसारखे रिलेशन तयार करायचे आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह सोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडलाय. या लग्न सोहळ्यामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची देखील परवानगी नव्हती, असे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार या विवाह सोहळ्यात शंभर लोकांची उपस्थिती होती. यामध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, सलमान खान, अक्षय कुमार, ईशांत शर्मा, एम एस धोनी, शाहरूख खान आणि केएल राहुल याचे अत्यंत जवळचे काही मित्र उपस्थित होते.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सुनिल शेट्टी यांनी शेरवानी घातल्याचे दिसत आहे. लाडक्या लेकीच्या लग्नानंतर सुनिल शेट्टी यांनी पैपराजी यांना मिठाईचे वाटप देखील केले.

अथिया शेट्टी हिची अत्यंत जवळची मैत्री कृष्णा श्रॉफ हिने देखील लग्नाला हजेरी लावली होती. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नातील फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI