खंडाळा: बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजत आहेत. अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी ही टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलशी लग्नगाठ बांधणार आहे. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून (22 जानेवारी) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. अथिया आणि केएल राहुलच्या लग्नमंडपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.