‘आदिपुरुष’चे फर्स्ट लूक पोस्टर आऊट, या दिवशी होणार चित्रपटाचा टीझर रिलीज…

| Updated on: Sep 30, 2022 | 10:17 AM

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये प्रभासचा जबरदस्त लूक दिसतोय. फर्स्ट लूक पोस्टर आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आदिपुरुषचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट, या दिवशी होणार चित्रपटाचा टीझर रिलीज...
Prabhas
Follow us on

मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन यांचा बहुचर्चित चित्रपट अर्थात ‘आदिपुरुष’ संदर्भात एक अत्यंत महत्वाचे अपडेट आहे. नुकताच चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर (First look poster) रिलीज करण्यात आले असून यासोबतच एक मोठी आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमीही सांगण्यात आलीये. आदिपुरुष हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील आहे. नुकताच प्रभास आणि क्रिती सनॉनने (Kriti Sanon) चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

इथे पाहा प्रभासने शेअर केलेली पोस्ट

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये प्रभासचा जबरदस्त लूक दिसतोय. फर्स्ट लूक पोस्टर आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. प्रभासच्या चाहत्यांना देखील त्याचा हा लूक प्रचंड आवडला आहे. पोस्टरमध्ये प्रभासच्या हातामध्ये धनुष्य आणि बाम दिसत असून दमदार स्टाईलमध्ये प्रभास दिसतोय. सोशल मीडियावर पोस्ट रिलीज करताना प्रभासने मोठी घोषणा देखील केलीये.

फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले की, अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर प्रवास सुरू करत आहे, आमच्यासोबत सामील व्हा…#आदिपुरुषअयोध्या असे प्रभासने लिहिले असून इतकेच नाही तर यावेळी प्रभासने चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटही जाहिर केलीये. यामुळे चाहत्यांचा चित्रपटाविषयी उत्साह अधिकच वाढलाय.

आदिपुरुष चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 11 मिनिटांना रिलीज होतोय. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये सिनेमागृहात रिलीज होणार आहे. प्रभाससोबतच अभिनेत्री क्रिती सनॉन देखील चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून टीझरची रिलीज डेटही जाहिर केलीये.