बाॅलिवूड इंडस्ट्रीला हृतिकच्या विक्रम वेधाकडून मोठ्या अपेक्षा, चित्रपटाची धमाकेदार सुरूवात?

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फेल जात आहेत. त्यामध्येच आता विक्रम वेधा रिलीज होत आहे.

बाॅलिवूड इंडस्ट्रीला हृतिकच्या विक्रम वेधाकडून मोठ्या अपेक्षा, चित्रपटाची धमाकेदार सुरूवात?
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 30, 2022 | 8:43 AM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित चित्रपट विक्रम वेधा अखेर आज 30 सप्टेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाकडून फक्त हृतिक रोशन किंवा निर्मात्यांनाच अपेक्षा नसून संपूर्ण बाॅलिवूड इंडस्ट्रीला या चित्रपटाकडून (Movie) प्रचंड अपेक्षा आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फेल जात आहेत. त्यामध्येच आता विक्रम वेधा रिलीज होत आहे. बाॅक्स ऑफिसवर (Box office) विक्रम वेधा धमाका करेल अशा अपेक्षा अनेकांना आहेत.

सध्या रिलीज झालेले बॉलिवूड चित्रपट बाॅक्स ऑफिसवर मार खाताना दिसत आहेत. यामुळे सलमान खानसारखे मोठे स्टार देखील सध्याच आपला चित्रपट रिलीज करण्याच्या अगोदर चार वेळा विचार करत आहेत. बाॅलिवूड इंडस्ट्रीतून हृतिक रोशनच्या विक्रम वेधाने काहीतरी कमाल करावी, अशा प्रार्थना देखील केल्या जात आहेत.

विक्रम वेधा हा चित्रपट 2017 मध्ये तामिळमध्ये हीट ठरला होता. त्याचेच विक्रम वेधा हा चित्रपट रिमेक आहे. यामुळे हे निश्चितच आहे की, साऊथमध्ये चित्रपटाला खास प्रतिसाद मिळणार नाहीये. विक्रम वेधाच्या पूर्ण अपेक्षा या हिंदी व्हर्जनमधूनच असणार आहेत.

2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत खराब ठरले आहे. मुळात कोरोनाच्यानंतरच बाॅलिवूड चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. PS-1 आणि विक्रम वेधा हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. मात्र, दोन्हीपैकी कोणता चित्रपट वरचढ ठरतो, हे पाहण्यासारखेच आहे. PS-1 आणि विक्रम वेधा या दोन्ही चित्रपटांची स्टोरी एकाच पुस्तकातून घेण्यात आलीये.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें