AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेता बनला पिता, लग्नाची झालेली जोरदार चर्चा; वरातीत पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. वडिलांच्या वाढदिवशीच हा अभिनेता पिता बनला आहे. 2023 मध्ये या दोघांनी मणिपूरमध्ये लग्न केलं होतं आणि त्यावेळी हा लग्नसोहळा विशेष चर्चेत होता.

वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेता बनला पिता, लग्नाची झालेली जोरदार चर्चा; वरातीत पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक
वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेता बनला पिताImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 12:23 PM
Share

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम यांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लिनने मुलीला जन्म दिला असून आई-वडील म्हणून रणदीप आणि तिचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रणदीपने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. विशेष म्हणजे रणदीपचे वडील रणबीर हुड्डा यांच्या वाढदिवशीच तो पिता बनला आहे. त्यामुळे हा दिवस आणखी खास असल्याची भावना त्याने व्यक्त केली. वयाच्या 49 वर्षी रणदीप पिता बनला असून नोव्हेंबर 2023 मध्ये त्याने लिनशी लग्न केलं होतं.

‘आजोबा आणि नातीला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी पिता बनलो. आज बाबांबद्दलचा आदर माझ्या मनात आणखी वाढला. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मला वडील बनवल्याबद्दल आणि आमच्या विश्वास या छोट्या परीला आणल्याबद्दल मी लिनचे आभार मानतो. एक छोटी मुलगी आणि आयुष्यभराचं प्रेम’, अशी पोस्ट लिहित रणदीपने फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये त्याच्या वडिलांनी नातीला हातात घेतल्याचं पहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये चिमुकलीचा हात दिसतोय. रणदीपच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रणदीप हुड्डाने लिन लैश्रामशी नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न केलं. या दोघांचं लग्न अनेकांसाठी अनोखं होतं. कारण रणदीप हरयाणातील जाट आहे, तर लिन मणिपूरची आहे. इंफाळमध्ये पारंपरिक मणिपुरी पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता. सेलिब्रिटींचा असा अनोखा लग्नसोहळा नेटकऱ्यांनीही पहिल्यांदाच पाहिलं होतं. “मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण लिनला भेटल्यावर लग्नाबद्दलचं माझं मत बदललं,” अशी कबुली त्याने एका मुलाखतीत दिली होती. इतकंच नव्हे तर जातीबाहेर लग्न करणारा मी कुटुंबातील पहिलाच व्यक्त आहे, असाही खुलासा रणदीपने केला होता.

रणदीप आणि लिनच्या लग्नाच्या वेळी मणिपूरमध्ये बरेच वाद सुरू होते. पण लग्न नवरीच्या शहरातच पार पडलं पाहिजे, असा त्याचा विचार होता. लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी रणदीपने भारतीय सैन्याची मदत घेतली होती. हरियाणाहून मणिपूरला गेल्यानंतर तो आणि त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्य हे एका लष्करी ब्रिगेडियरच्या घरी राहिले होते.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर