असे नेमके काय झाले की, चक्क हुमा कुरेशी म्हणाली सोनाक्षी सिन्हा माझी मैत्रीण नाही…

या चित्रपटात या दोघी अचानकपणे मैत्रिणी होतात आणि पुढे काय धमाल करतात हे सर्व दाखण्यात आले आहे

असे नेमके काय झाले की, चक्क हुमा कुरेशी म्हणाली सोनाक्षी सिन्हा माझी मैत्रीण नाही...
| Updated on: Nov 09, 2022 | 9:10 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा प्रचंड चर्चेत आहेत. हुमा आणि सोनाक्षी यांचा डबल XL हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी हुमा आणि सोनाक्षीने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. या चित्रपटात या दोघी अचानकपणे मैत्रिणी होतात आणि पुढे काय धमाल करतात हे सर्व दाखण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान देखील सोनाक्षी आणि हुमा मस्ती करताना दिसल्या. सर्वांना वाटले की, रिअलमध्येही सोनाक्षी आणि हुमा चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र, हुमाने जरा स्पष्ट शब्दात मी आणि सोनाक्षी मैत्रिणी नसल्याचे सांगितले आहे.

कतरिना कैफचा फोन भूत, जान्हवी कपूरचा मिली, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा डबल XL हे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर एकाच दिवशी रिलीज झाले. तिन्ही चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. त्यामध्येही सर्वात कमी कमाई सोनाक्षी आणि हुमाच्या चित्रपटाने केलीये. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.

एका मुलाखतीदरम्यान हुमा कुरेशीला सोनाक्षी आणि तिच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आले. यावेळी हुमा म्हणाली की, मी आणि सोनाक्षी मैत्रिणी नसून मी सोनाक्षीला माझी बहीण मानते. कारण आम्ही दोघी आता मैत्रीच्या नात्यापेक्षाही पुढे गेलो आहोत. डबल XL चित्रपटाच्यावेळी आम्ही खूप वेळ सोबत घालवला आहे. आज आमच्यामध्ये एक सुंदर नाते आहे.

Follow Us