‘कतरिना कैफ’च्या फोन भूत चित्रपटाची चौथ्या दिवशीही कामगिरी निराशाजनकच…

| Updated on: Nov 08, 2022 | 9:03 AM

चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले असले तरीही चित्रपटांना प्रेक्षकांचा अजिबातच प्रतिसाद मिळाला नाहीये.

कतरिना कैफच्या फोन भूत चित्रपटाची चौथ्या दिवशीही कामगिरी निराशाजनकच...
Follow us on

मुंबई : शुक्रवारी बाॅक्स ऑफिसवर कतरिना कैफ, जान्हवी कपूर आणि सोनाक्षी सिन्हा या तीन अभिनेत्रींचे चित्रपट रिलीज झाले. मात्र, चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले असले तरीही चित्रपटांना प्रेक्षकांचा अजिबातच प्रतिसाद मिळाला नाहीये. जान्हवीचा मिली आणि सोनाक्षी सिन्हाचा डबल XL या चित्रपटांकडे तर प्रेक्षकांनी पाठच फिरवली आहे. कतरिना कैफचा फोन भूत चित्रपट ठीक ठीक कमाई करतोय. फोन भूतमध्ये कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये.

सोनाक्षी सिन्हाच्या डबल XL चित्रपटाची जेवढी सुरूवातीला चर्चा होती, त्या तुलनेत चित्रपट फेल गेला आहे. जान्हवी कपूरच्या वडिलांनी अर्थात बोनी कपूर यांनी मिली चित्रपटाची निर्मिती केलीये. या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिकेत आहे. डबल XL मध्ये सोनाक्षीसोबत हुमा कुरेशी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

सोनाक्षीच्या चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. विशेष म्हणजे चित्रपटाचे टीझर चाहत्यांना आवडले देखील होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काहीच धमाका करू शकला नाहीये. शुक्रवारी रिलीज झालेले बाॅलिवू़डचे तिन्ही चित्रपट फेल गेले आहेत.

सोमवारीही कतरिनाच्या फोन भूत चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करता आला नाहीये. सोमवारी केवळ 1.32 कोटींची कमाई फोन भूत चित्रपटाने केलीये. चित्रपटाचे एकूण कलेक्शन भारतात केवळ 9.17 कोटींवर पोहोचले आहे. पुढील काही दिवसात चित्रपट धमाका करेल अशी अपेक्षा फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.