Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते…
पुष्पा द राइज (Pushpa The Rise) थिएटरमध्ये आज प्रदर्शित झाला. समंता(Samantha Ruth Prabhu)चाही चाहतावर्ग मोठा आहे. या सिनेमातलं तिचं गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

मुंबई : पुष्पा द राइज (Pushpa The Rise) थिएटरमध्ये आज प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि फहाद फासिल(Fahad Faasil)च्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. समंता(Samantha Ruth Prabhu)चाही चाहतावर्ग मोठा आहे. या सिनेमातलं तिचं गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
आधी रिलीज केला होता लिरिकल व्हिडिओ
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा रिलीजआधी सामंताच्या ट्रॅकचा मुख्य म्युझिक व्हिडिओ ऑनलाइन रिलीज केला नाही, पण एक लिरिकल व्हिडिओ रिलीज केला गेला. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. तिच्या लूकबद्दल चाहत्यांना उत्सुकता निर्माण करण्यासाठी तो व्हिडिओ पुरेसा होता. रिलीझ झाल्यापासून अवघ्या सात दिवसांत, लिरिकल व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले19 सेकंदांचा आणखी एक प्रोमो व्हिडिओही रिलीज करण्यात आला होता.
तेलंगाणा-आंध्रात तुफान
आता सिनेमा रिलीज झालाय. त्यातलं समंताचं वेड लावणारं गाणं #Oo Antava oo Antava (Telugu) चाहत्यांना थिरकायला भाग पाडतंय. तेलंगाणा आणि आंध्रात या गाण्यावर थिएटरमध्ये चाहते थिरकत आहेत. त्याचे व्हिडिओही तुफान व्हायरल होतायत. चित्रपटासह यातली गाणीही खूप चर्चेत आहेत. देवी श्री प्रसाद या साऊथ इंडियन म्युझिशियननं याला संगीत. यूट्यूबला ही गाणी ट्रेंडिंगला आहेत. विशेष म्हणजे तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नडमधील गाणीही प्रचंड ऐकली, पाहिली जाताहेत. तेलुगू भाषेतल्या या गाण्याला यूट्यूबवही प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ट्रेंडिंगला आहे. इंद्रावती चौहान (Indravathi Chauhan)नं ते गायलंय. आता ओरिजिनल व्हिडिओ सॉन्गही रिलीज झालंय. सिनेमासह चाहते ते एन्जॉय करतायत. हे गाणं तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीतही रिलीज झालंय. चाहत्यांनाही ते प्रचंड आवडलंय.