Rahul Mahajan : वडील गेले अन् सर्वच… राहुल महाजन वडिलांच्या आठवणीने व्याकूळ

राहुल महाजन यांनी नुकत्याच दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वडिलांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. २० वर्षांपूर्वी वडील गमावल्याचे सांगताना ते भावूक झाले. वडिलांच्या जाण्याने त्यांचे आयुष्य कसे बदलले, 'डाऊनफॉल' कसा सुरू झाला आणि खासगी दु:ख व्यक्त करतानाही मीडियाच्या गराड्यामुळे कसे अडकले, हे त्यांनी सांगितले.

Rahul Mahajan : वडील गेले अन् सर्वच... राहुल महाजन वडिलांच्या आठवणीने व्याकूळ
rahul mahajan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 5:35 PM

तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे फोन येतात. तुमच्या मोबाईलवर त्यांचं नाव दिसतं. पण गेल्या 20 वर्षापासून मला वडिलांचा फोन आला नाही… असं सांगताना राहुल महाजन अत्यंत भावूक झाले. रिअॅलिटी टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेले राहुल महाजन यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. यावेळी राहुल महाजन वडिलांच्या आठवणीने भावूक झाले. वडील गेल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आयुष्यात कसे वादळ आले? संकटामागून संकटं कसे येत होते हे राहुल यांनी सांगितलं. माझे वडील गेले आणि माझा डाऊनफॉल सुरू झाला, असं राहुल महाजन म्हणाले.

काय होतं माहीत आहे का? तुमच्या जवळची व्यक्ती गेल्यावर तुम्ही सुन्न पडता. काय होतंय हे समजत नाही. काय करायचं हे कळत नाही. आज वडील जाऊन 20 वर्ष झाली आहेत. त्यामुळे मी यावर बोलत आहे. पण वडील गेल्याचं जे दु:ख आहे, ते आजही तेवढंच आहे. आयुष्यात आता जे सुख आणि दु:खाचे क्षण येतात. त्यात त्यांची साथ नसते ही खंत आहे. आज मी जे काही करतोय, ते पाहण्यासाठी वडील नाहीयेत, असं राहुल यांनी सांगितलं.

Loading...

गेल्या 20 वर्षापासून…

तुमच्याकडे मोबाईल आहे. त्यावर तुमच्या आईवडिलांचा फोन येतो. याशिवाय आनंदाची दुसरी गोष्ट नाही. पण माझ्या मोबाईलवर गेल्या 20 वर्षापासून वडिलांचा फोन आला नाही, असं सांगताना राहुल अत्यंत भावूक झाले. त्यांचे डोळे भरून आले. माझे वडील गेले त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर मीडियाचा गराडा होता. माझ्या चेहऱ्याच्या समोरच कॅमेरे होते. लोकांनी मला त्यावेळी कॅमेऱ्यात पाहून काय म्हटलं असेल मला त्याचा काही फरक पडत नाही. चोहोबाजूला कॅमेरे होते याचं मला दु:ख आहे. माझे वडील गेले, त्याचं दु:खही मी व्यक्त करू शकलो नाही, असं ते म्हणाले.

वडील गेले, सर्वच गेलं

वडील गेले. आता त्यापेक्षा अजून वाईट वेळ काय येईल? असा मी विचार केला. माझे वडील गेले, माझी प्रायव्हसी गेली. माझी पत आणि प्रतिष्ठा गेली. सर्व काही गेलं. त्यानंतर यापेक्षाही वाईट होऊ शकतं हे मला आयुष्याने परत एकदा सांगितलं. वडील जाऊन एक महिनाही झाला नव्हता अन् मी तिहार तुरुंगात गेलो. दैवाची करणी पाहा, अशी वेदनाही त्यांनी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us