Rahul Gandhi: टॉपच्या अभिनेत्रीचं राहुल गांधी यांच्यावर जडलेलं असं प्रेम, डेटबाबत म्हणाली..

राहुल गांधी यांना डेट करण्यामागचं स्मार्ट कारणसुद्धा या अभिनेत्रीने शोमध्ये सांगितलं होतं. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून कपूर घराण्यातली मोठी अभिनेत्री आहे.

Rahul Gandhi: टॉपच्या अभिनेत्रीचं राहुल गांधी यांच्यावर जडलेलं असं प्रेम, डेटबाबत म्हणाली..
Rahul Gandhi: टॉपच्या अभिनेत्रीचं राहुल गांधी यांच्यावर जडलेलं असं प्रेम
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 7:40 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना डेट करण्याची इच्छा एका प्रसिद्ध अभिनेत्रीने (Bollywood Actress) व्यक्त केली होती. या अभिनेत्रीचं राहुल गांधी यांच्यावर प्रेम जडलं होतं. एका टॉक शोमध्ये तिने याचा खुलासा केला होता. राहुल गांधी यांना डेट करण्यामागचं स्मार्ट कारणसुद्धा या अभिनेत्रीने शोमध्ये सांगितलं होतं. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून कपूर घराण्यातली (Kapoor Family) मोठी अभिनेत्री आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या लव्ह-लाइफमुळे चर्चेत राहिली. इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक हँडसम हंकसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र करीनाने शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्यासोबतचंच नातं जगजाहीर केलं होतं. मात्र सैफ आणि शाहिदव्यतिरिक्त करीनाने चक्क राहुल गांधी यांचं नाव एका टॉक शोमध्ये डेटिंगसाठी घेतलं होतं.

हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी खुद्द करीनाने एका टॉक शोमध्ये याविषयीचा खुलासा केला होता. Rendezvous With Simi Garewal असं त्या शोचं नाव होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या शोमध्ये सिमी ग्रेवालने करीनाची मुलाखत घेतली. कोणत्या व्यक्तीला डेट करायची तुझी इच्छा आहे, असा प्रश्न सिमीने करीनाला विचारला होता. त्यावर उत्तर देताना करीना म्हणाली होती, “मला माहीत नाही, हे म्हटलं पाहिजे की नाही. हे वादग्रस्त ठरेल का याची मला पर्वा नाही. मला राहुल गांधी यांना ओळखण्याची इच्छा आहे. ”

“मी त्यांचे फोटो मॅगझिन्समध्ये पाहिले आहेत. त्यांच्याशी संवाद कसा साधता येईल, असा विचार मी केला. मी एका फिल्मी घराण्याची आहे आणि ते राजकीय घराण्यातील आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमधील संवाद फारच रंजक असेल असं मला वाटतं”, असंही ती म्हणाली होती. जवळपास आठ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे.

करीनाने 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ आणि करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी हे अविवाहित असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहेत.