Tiger Shroff Case : झंगी ॲप, हजारो रुपये अन् कचऱ्याचा ढिगारा…, आरोपींना कुठून आणि कशी झालेली फंडिंग? मोठी माहिती समोर

Tiger Shroff Case : अभिनेता टागयर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना फंडिंग कुठू आणि कशी झाली शिवाय त्यांनी शस्त्रांचा पुरवठा कसा झाला... या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Tiger Shroff Case : झंगी ॲप, हजारो रुपये अन् कचऱ्याचा ढिगारा..., आरोपींना कुठून आणि कशी झालेली फंडिंग? मोठी माहिती समोर
Tiger Shroff
| Updated on: Oct 20, 2026 | 12:08 PM

Tiger Shroff Case : बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर देखील गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. टायगर याच्या कारवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्यामुळे खळबळ फडाली आहे. आता हल्ला करणाऱ्यांना फंडिगं कोण करत होतं… याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर, हल्लेखोरांपर्यंत शस्त्र कशी आली… याची देखील माहिती समोर आली आहे. ही शस्त्र कोणत्या व्यक्तीने नाही तर, प्लान करुन हल्लेखोरांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनिल पंडित याने सांगितल्यानंतर तीन कथित आरोपींपर्यंत शस्त्र पोहोचवण्यात आलीत. तीन आरोपी जंगी ॲपच्या माध्यमातून अनिल पंडित याच्या संपर्कात होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, रेहान आणि फूल सिंह यांनी अमृतसर येथील उद्योजकावर देखील हल्ला केला आहे. मुंबई राहण्यासाठी त्यांनी रोजचे 5 ते 10 हजार रुपये मिळत होते. ट्रेकिंग टाळण्यासाठी आरोपी स्थानिक दुकानदारांचा किंवा कोणाही व्यक्तीचा QR कोड अनिल पंडितला पाठवत असत आणि त्याच्याकडे पैसे जमा होत असत. याच रोख पैशातून त्यांचा संपूर्ण खर्च चालत होता.

Loading...

हल्लेखोरांना शस्त्र मिळाले कसे?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. ‘झंगी’ (Zangi) ॲपचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे खातं तयार करण्यासाठी किंवा वैयक्तिक माहितीसाठी कोणत्याही मोबाईल नंबरची गरज भासत नाही आणि याचा डेटा देखील कोणत्याही सर्व्हरवर सुरक्षित राहत नाही. पकडले जाण्याच्या भितीने हे लोक बोलून झाल्यानंतर सिम कार्ड ताबडतोब तोडून फेकून देत असत. आरोपींकडे शस्त्रेही इंदूर आणि मुंबईतून आली होती. शस्त्रे देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही व्यक्ती आली नव्हती, तर मोबाईलवर लोकेशन आणि व्हिडिओ पाठवून कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळील एखाद्या डब्यात शस्त्रे पाठवली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत कोटा येथेच ठेवलं आहे. कोटा येथील रेल्वे कॉलोनी पोलीस स्टेशन येथे तिन्ही आरोपींना ठेवण्यात आलं आहे. आज रस्ते मार्गाने आरोपींना मुंबई आणणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. रेल्वे कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अवघ्या 4 तासांतच बदललं जात आहे. मुंबई पोलिसांनी रात्री आरोपींची तीन फेऱ्यांमध्ये चौकशी केली आहे. सूत्रांनुसार, चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us