Tiger Shroff Case : मच्छरासारखा… भिकाऱ्या सारखा दिसणारा आणि एवढ्या गोळ्या; प्रत्यक्षदर्शी सलमाने काय सांगितलं?

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी सलमा शेखने हल्लेखोरांचे वर्णन 'मच्छरासारखा, भिकारीसारखा' असे केले. जुहू येथे टायगर बाहेर पडताना हा हल्ला झाला. सलमा ब्लॉग बनवत असताना तिने गोळीबाराचा आवाज ऐकला. टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागल्याचे तिने सांगितले. हा धक्कादायक प्रकार अनेकांनी पाहिला.

Tiger Shroff Case : मच्छरासारखा... भिकाऱ्या सारखा दिसणारा आणि एवढ्या गोळ्या; प्रत्यक्षदर्शी सलमाने काय सांगितलं?
Tiger Shroff
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 10:46 AM

Tiger Shroff Case : प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कोटा येथून अटक केली आहे. या आरोपींना आज मुंबईत आणण्यात येणार आहे. या हल्ल्याने सर्वच हादरून गेले. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षदर्शीही बिथरले आहेत. सलमा शेख या महिलेने हा हल्ला होताना पाहिला. तिने जे सांगितलं त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही महिला हल्ल्याच्यावेळी ब्लॉग बनवत होती. टायगरला आवाज देऊन बोलवत होती. त्यावेळी अचानक गोळ्यांचा आवाज आला. तिला आधी वाटलं फटाके फुटत आहेत. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. टायगरवर हल्ला झाल्याचं लोक ओरडायला लागले. त्यामुळे तीही घाबरून गेली होती. सलमाच्या मते, हल्लेखोर दिसायला अत्यंत सडपातळ होता. मच्छरासारखा दिसत होता. भिकारी सारखा वाटत होता. पण तो एवढ्या गोळ्या झाडत होता.

मुंबईच्या जुहू परिसरात रविवारी नेहमी प्रमाणेच कमी अधिक वर्दळ होती. टायगर श्रॉफ इथून फुटबॉल खेळून बाहेर पडला. त्यावेळी मैदानाच्या बाजूला लोकांची वर्दळ होती. टायगरची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर झाले होते. काही लोक मोबाईलवर व्हिडीओ बनवत होते. याच लोकांमध्ये ब्लॉगर सलमा शेखही होती. सलमा तिच्या ब्लॉगसाठी व्हिडीओ बनवत होती. तिने टायगरला आवाज देऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. टायगरबाबत मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. त्याला भरपूर व्ह्यूज मिळाल्या होत्या. त्याची माहिती मला टायगरला द्यायची होती. पण टायगर पुढे निघून गेल्याने त्याच्याशी बोलणं झालं नाही, असं सलमा म्हणाली. काही वेळा नंतर इतकं भयंकर काही होईल, याचा सलमाला अंदाजही नव्हता. नंतर तिला गोळ्यांचा आवाज ऐकायला आला. आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सर्वच सैरावैरा धावायला लागले.

Loading...

कार मैदानातून रस्त्यावर आली अन्….

टायगरची कार मैदानातून निघून रस्त्यावर आली. तेव्हा फायरिंग झाली. सुरुवातीला तिथे असलेल्या लोकांना फटाके फुटले की काय असं वाटलं. अचानक आवाज झाल्याने कुणालाच काही समजलं नाही. काही तरी भयंकर घडतंय हे कुणालाच कळलं नाही. त्यानंतर लोकांचे आवाज बदलले. आरडाओरडा सुरू झाला. टायगरवर हल्ला झाल्याचं लोक ओरडू लागले. एकच पळापळ सुरू झाली. त्यावेळी मलाही हा फटाक्याचा आवाज नसल्याचं लक्षात आलं. गोळीबार झाल्याचं एव्हान समजलं, असं सलमा म्हणाली.

तो मच्छरासारखा…

सलमाने या आरोपीचं वर्णन केलंय. तिच्या मते, हल्लेखोर अत्यंत सडपातळ होता. रस्त्यावर राहणाऱ्या एखाद्या व्यक्ती सारखा दिसत होता. समोर पाहताच मच्छर वाटेल असा होता, असं ती म्हणाली. एकूण तीन आरोपींनी हा हल्ला केला. दोघांनी हल्ला केला. तिसरा बाईक स्टार्ट करून होता. हल्ला होताच तिघे बाईकवरून पळून गेले. या हल्ल्यात टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली. त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us