हे अजिबात खपवून घेणार नाही.. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय थेट म्हणाले, मी..
CM Vijay On Trisha : मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय उर्फ थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी विरोधकांना महिलांवरील आक्षेपार्ह भाषेच्या मुद्द्यात दिला. विरोधकांकडून त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय उर्फ थलपती विजय त्यांच्या राजकीय जीवनासोबतच खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत आहेत. थलपती विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने त्यांच्याविरोधात केलेला घटस्फोटाचा खटला मागे घेतला. त्यानंतर थलपती विजय यांची अत्यंत जवळची मैत्री अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्याने विविध चर्चांना उधाण आले. त्यातच तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी नुकताच विधानसभेत महिलांवरील आक्षेपार्ह आणि अश्लील टिपण्यावरून कठोर भूमिका घेतली आहे. अत्यंत जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याविरोधात राजकीय नेत्यांकडून मोठी टिप्पणी करण्यात आली. थलपती विजय यांनी म्हटले की, माझ्या राजकीय विजयात महिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मी महिलांविरोधात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा अजिबात खपवून घेणार नाही.
राजकारणात राजकीय टीका नक्कीच असू शकते. पण कोणत्याही महिलेचा सन्मान राखलाच पाहिजे, अशी भूमिका मांडताना त्यांनी मोठा इशारा दिला. कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका करताना डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल धक्कादायक विधान केले. ज्यानंतर मोठी आंदोलने झाली.
हेच नाही तर त्रिशा कृष्णन यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणात प्रवीण गणेश या एका उद्योजकावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. एक्सवर पोस्ट शेअर करणे त्याला चांगलेच महागात पडले. त्रिशा कृष्णन ही मुख्यमंत्री विजय यांची अत्यंत जवळची मैत्रीण आहे.
ती अनेकदा विजय यांच्यासोबत दिसली आहे. त्यातच आता विधानसभेत बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी यादरम्यान स्पष्ट केले. त्यांनी एकप्रकारे विरोधकांना मोठा इशाराच दिला. त्रिशा कृष्णन विरोधात सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या जातात, ज्यात आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करणाऱ्याविरोधात कारवाई मोठ्या प्रमाणात केली जातंय.