टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, लवकरात लवकर

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. जुहूसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर गर्दीत टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्याचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या गोळीबारानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, लवकरात लवकर
Tiger Shroff and Sunetra Pawar
| Updated on: Oct 19, 2026 | 9:19 AM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. हा गोळीबार अशावेळी झाला, ज्यावेळी टायगर श्रॉफ याच्या आजुबाजूला मोठ्या संख्येने चाहते होते. अभिनेता जात असल्याचे पाहून चाहते त्याच्या गाडीजवळ समजले. तो चाहत्यांना हात दाखवत होता. त्यावेळीच हा गोळीबार झाला. लोक अगदी जवळ असताना टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाला. यादरम्यान गोळी थेट त्याचा चालकाला लागली. ज्यानंतर चालक गाडीमधून उतरून बाजूच्या सीटवर बसताना दिसत आहे. त्यानंतर गाडी स्वत: टायगर श्रॉफ याने चालवण्यास घेतली. गाडीचा दरवाजाही काही वेळासाठी उघडण्यात आला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. टायगर श्रॉफ याच्या गाडीवर कशाप्रकारे गोळीबार करण्यात आला, हे व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला.

जुहूसारख्या ठिकाणी ही घटना घडल्याने बॉलिवूड कलाकारांनी तणावाचे वातावरण आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: टायगर श्रॉफच्या भेटीला पोहोचले. यावेळी त्यांनी टायगर श्रॉफ याच्या कुटुंबियांसोबत काही वेळ चर्चा केली. टायगर श्रॉफ हा देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना दिसला. यादरम्यानचे काही फोटोही पुढे आले.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफ याच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या वाहनावर झालेला गोळीबार निषेधार्ह आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

मुंबईतील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शहराची शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर बॉलिवूड कलाकारांची धाबे दणाणली आहेत. जुहू परिसरात बॉलिवूड कलाकार फिरत असतात. जवळपास कलाकार त्याच भागात राहतात. मात्र, तिथेच ही घटना घडल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us