‘धुरंधर’मध्ये 14 सेकंदांचा सीन करून पाकिस्तानात लोकप्रिय ठरला ‘हा’ अभिनेता

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात भूमिका साकारून हा अभिनेता रातोरात स्टार बनला आहे. सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली असून पाकिस्तानमधील लोकसुद्धा त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

धुरंधरमध्ये 14 सेकंदांचा सीन करून पाकिस्तानात लोकप्रिय ठरला हा अभिनेता
dhurandhar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2026 | 3:21 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या भूमिकेतलाही कलाकार ‘धुरंधर’मुळे सोशल मीडियावर चर्चेत आला. असाच एक कलाकार म्हणजे विवेक सिन्हा. ‘धुरंधर’मध्ये त्याची भूमिका छोटी पण तितकीच दमदार होती. म्हणूनच स्क्रीन स्पेस मर्यादित असूनही प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलं आहे. विवेकने या चित्रपटात जहूर मिस्त्रीची भूमिका साकारली होती. “हिंदू एक डरपोक कौम है”, हा त्याचा डायलॉग खूप व्हायरल झाला होता. विवेकला फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तानातूनही भरपूर प्रेम मिळतंय. त्याला पाकिस्तानी चाहत्यांकडून दररोज भरभरून मेसेजेस येत आहेत.

‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक याविषयी म्हणाला, “माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 2000 कमेंट्स आहेत. मी या सर्व गोष्टींना खूप एंजॉय करतोय. मला पाहून राग येत असल्याचं लोक म्हणत आहेत. स्क्रीनमध्ये घुसून मला मारावंसं वाटतंय, अशा प्रतिक्रिया ते देत आहेत. पण मी खूप चांगलं काम केलंय, असंही ते म्हणत आहेत. काही जण तर अशीही धमकी देत आहेत की, ते मला पाकिस्तानात येऊन मारतील. त्यामुळे मला त्यांना स्पष्ट करावं लागलं की मी पाकिस्तानाच नाही, मी भारतीयच आहे. मी बिजनौरचा आहे. पाकिस्तानमधूनही मला खूप प्रेम मिळतंय. आय लव्ह यू सर.. असे मेसेज मला येत आहेत. धुरंधर 2 या चित्रपटाच्या यशामुळे मी खूप खुश आहे.”

‘धुरंधर’मुळे विवेकला आज जरी स्टारडम मिळत असलं तरी त्याने त्याच्या आयुष्यात बराच संघर्ष केला आहे. सहा वर्षांचा असताना त्याने त्याच्या वडिलांना गमावलं होतं. आईनेच त्याचं संगोपन केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो सर्वसामान्य नोकरी करू लागला होता. एका व्यक्तीने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिल्यानंतर तो छोट्या-मोठ्या भूमिका साकारू लागला होता. आता ‘धुरंधर’मुळे त्याला खरी ओळख मिळाली आहे. या चित्रपटानंतर विवेकचं संपूर्ण आयुष्यच बदललं आहे. ‘धुरंधर’च्या ट्रेलरमधील त्याचा 14 सेकंदांचा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे.

Follow Us