Nana Patekar : आठ रुपयांची एक साधी गोळी वाचवू शकली असती नाना पाटेकरांचे प्राण, प्रसिद्ध डॉक्टरचा मोठा दावा VIDEO

Nana Patekar : "असं समजा की ती रक्ताची गुठळी अशा रक्तवाहिनीमध्ये अडकली की जिथून ह्दयाला 60 ते 70 टक्के रक्तपुरवठा होतो तर तो मेजर हार्ट अटॅक. ह्दयामधील ज्या भागाला कमी रक्तपुरवठा लागतो, अशा ठिकाणी ती गुठळी अडकली तर 20 ते 30 ह्दयाचा वीजपुरवठा खंडीत होतो. त्याला मायनर हार्ट अॅटक म्हणतात"

Nana Patekar : आठ रुपयांची एक साधी गोळी वाचवू शकली असती नाना पाटेकरांचे प्राण, प्रसिद्ध डॉक्टरचा मोठा दावा VIDEO
Nana Patekar
| Updated on: Oct 17, 2026 | 4:08 PM

अभिनेते नाना पाटेकर यांचं मागच्या आठवड्यात अकाली निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकरांनी गोव्यातील घरी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांचं निधन हार्ट अटॅकने झाले. नानांच्या निधनानंतर आता डॉक्टर संदीप नागरे यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एका आठ रुपयाच्या गोळीमुळे नाना पाटेकरांचे प्राण वाचू शकले असते. त्यांनी काय म्हटलय ते जाणून घेऊया. “कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला. त्यांना वेळेत मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचू शकले असते” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले. “काय चूक झाली, काय करायला पाहिजे होतं. नाना पाटेकर यांना रात्री 2 वाजता चेस्ट पेन सुरु झालं. त्यांनी मित्राला मेसेज केला की मला अस्वस्थ वाटतय. मित्र येईपर्यंत, डॉक्टर येईपर्यंत बराच वेळ गेला. हार्ट अटॅकला डॉक्टर लोक मायकार्डियल इन्फेक्शन म्हणतात. माय म्हणजे मसल्स आणि कार्डियल म्हणजे ह्दय. मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे ह्दयाच्या मासपेशी मृत होणं” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले.

“हार्ट अटॅक हा हद्याच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळ्या झाल्याशिवाय येऊच शकत नाही.प्लाक्स जरी असले किंवा कुठल्याही रक्तवाहिनीत इंजरी झाल्यामुळे ब्लिडिंग होतं. त्या ब्लिडिंगमुळे रक्ताची नॅचरल पातळी ठेवण्याची क्षमता कमी झाली, तर ब्लड क्लॉट तयार होतो. हा ब्लड क्लॉट रक्तात धावायला, पळायला लागला की, ह्दयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकला तर ज्या भागाला रक्तपुरवठा ती रक्तवाहिनी करते, ती रक्तवाहिनी पंपिंग करणं सोडून देते. तो क्लॉट कुठल्या रक्तवाहिनीत अडकलाय त्यावरून हार्ट अटॅक मेजर किंवा मायनर ते ठरतं” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले.

Loading...

मेजर आणि मायनर हार्ट अटॅक कशाला म्हणतात?

“असं समजा की ती रक्ताची गुठळी अशा रक्तवाहिनीमध्ये अडकली की जिथून ह्दयाला 60 ते 70 टक्के रक्तपुरवठा होतो तर तो मेजर हार्ट अटॅक. ह्दयामधील ज्या भागाला कमी रक्तपुरवठा लागतो, अशा ठिकाणी ती गुठळी अडकली तर 20 ते 30 ह्दयाचा वीजपुरवठा खंडीत होतो. त्याला मायनर हार्ट अॅटक म्हणतात”

रक्त पातळं होणं कमी का होतं?

“पण ही रक्ताची गुठळी का तयार होते?. रक्ताची नैसर्गिक क्षमता असते रक्त पातळ ठेवण्याची ती हळूहळू कमी व्हायला लागते. ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना टाइप 1,2 डायबिटीस आहे, ज्यांच्या ह्द्यात साखर आहे, हाय ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, कोलेस्ट्रॉल आहे. एक्सरसाइज करत नाहीत अशा व्यक्तींची रक्ताची रक्त पातळ ठेवण्याची क्षमता कमी होते” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले.

सात-आठ रुपयांची गोळी आहे

“अशी रक्ताची गुठळी तयार झाली तुमच्या रक्तवाहिनीत अडकली तर लगेच तुम्हाला चेस पेन सुरु होणार, मानेत, जबड्यामध्ये दुखणार. उलटी सारखं वाटू शकतं. घाम येईल. अशावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारुन ठेवलं पाहिजे की रक्त पातळ करण्यासाठी मी कुठलं औषध घेऊ शकतो” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले. “अशावेळी रामबाण उपाय आहे डिस्परीन. सात-आठ रुपयांची गोळी आहे. ही गोळी सोबत असेल तर तुम्ही आयुष्य वाचवू शकता. 325 मिलिग्रामची ही गोळी आहे. जेव्हा चेस पेन सुरु होतं, तेव्हा ती गोळी चावून-चावून खायची असते. चावल्यामुळे ती ताबडतोब ती रक्तात विरघळते, त्याचे परिणाम दिसायला लागतात” असा दावा डॉ. संदीप नागरे यांनी केला.

तुमच्या कारमध्ये, बेडरुममध्ये ही गोळी असली पाहिजे

“काही लोक नेहमी इकोस्पिरन गोळी घेतात, ज्यावेळेस चेस पेन सुरु होतं, तेव्हा इकोस्पिरन घ्यायची नसते. डिस्परीन घ्यायची असते. पण ब्लिडिंग टेडेन्सी आहे का? ते विचारुन घेतलं पाहिजे.डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तुम्ही बिनधास्त गोळी घेऊ शकता. तुमच्या कारमध्ये, बेडरुममध्ये ही गोळी असली पाहिजे. नाना पाटेकरांना ही गोळी दिली होती की नाही हे माहित नाही. या गोळीमुळे त्यांचे प्राण वाचू शकले असते. डॉक्टरांना विचारुन तुम्ही ही गोळी घेऊ शकता” असं डॉ. संदीप नागरे म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us