Top 5 News | अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा ते स्वरा भास्कर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

| Updated on: Aug 19, 2021 | 10:23 AM

दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही बुधवार खूप महत्त्वाचा होता.

Top 5 News | अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा ते स्वरा भास्कर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top 5 News
Follow us on

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही बुधवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही बुधवार म्हणजेच 19 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा, मात्र तूर्तास सुटका नाहीच!

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणात राज कुंद्राला (Raj Kundra) अटकेपासून अंतरिम संरक्षण दिला आहे. राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला की, एफआयआरमधील सहआरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व 7 वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी दिली पाहिजे. मात्र या याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीची भूमिका या प्रकरणातील इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. जस्टिस संदीप के. शिंदे यांनी कुंद्राला अटक होण्यापासून संरक्षण देणारा अंतरिम आदेश 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत निर्देशित केला आहे.

जेव्हा हेमा मालिनी ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणासाठी अफगाणिस्तानला पोहचल्या होत्या, कशी होती तेव्हाची परिस्थिती?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने देशाची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यापासून जगभरात खळबळ उडाली आहे. सोमवारी, अनेक अफगाणी आणि परदेशी नागरिक काबूल विमानतळावर देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. गृहयुद्धाच्या वातावरणात, अफगाणिस्तानची परिस्थिती अशी आहे की, तिथल्या प्रत्येकाला तालिबानच्या भीतीने तिथून बाहेर पडायचे आहे. अफगाणिस्तानातील या परिस्थिती पाहून बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी देखील दुःखी झाल्या आहेत. यावेळी हेमा मालिनी यांनी 70च्या दशकातील एक आठवण शेअर केली, जेव्हा त्या त्यांच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. हेमा मालिनी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत किती फरक पडला आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे काही पोस्टर शेअर केले आहेत. हे शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले- “एकेकाळी शांतता असलेल्या अफगाणिस्तान या देशामध्ये आज जे घडत आहे ते खरोखरच दुःखद आहे.”

‘स्पायडरमॅन’ बनून राखी सावंतला करायचीय ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) वूटवर सुरू झाला आहे आणि शो चांगलाच पसंत केला जात आहे. अनेक सेलेब्स शोचा एक भाग बनले आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना देखील आवडतायत. करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करत आहे. ‘बिग बॉस 14’मध्ये छाप पाडणारी राखी सावंत (Rakhi Sawant) आता या शोचा देखील एक भाग बनू इच्छित आहे. ज्यासाठी तिने स्वतः एक वेगळा अवतार धारण केला आहे. राखीच्या नवीन अवताराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘एंटरटेनमेंट क्वीन’ राखी सावंतने शोमध्ये प्रवेश न मिळाल्याबद्दल राग व्यक्त केला आहे. राखीला स्पायडरमॅन पोशाख आणि मेकअपमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात जायचे आहे. या ड्रेस अपसह तिने गळ्यात दोन सोनेरी रंगाच्या मोठ्या माळा देखील घातल्या आहेत.

‘मला माझ्यासोबत नाना हवे आहेत!’, ‘आई कुठे काय करते’च्या ‘अनघा’चा ‘हा’ खास टॅटू पाहिलात का?

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांवर आपल्या प्रियजनांना गमावण्याची वेळ आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला होता. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनाशी लढताना निधन झाले होते. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. पितृछत्र हरपल्यानंतर आता अश्विनीने एक खास टॅटू कोरून घेत आपल्या वडिलांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. अश्विनी आपल्या वडिलांना ‘नाना’ म्हणायची. आपले वडीलच आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हणत ती नेहमीच आपल्या वडिलांचे आभार मानायाचिया. आता या खास टॅटूमुळे तिने पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

तालिबानी टेररची थेट हिंदुत्वाशी तुलना, #ArrestSwaraBhasker सोशल मीडियावर ट्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायला अजिबात धजत नाही. आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करला यावेळी आपले मत व्यक्त करणे महागात पडले आहे. स्वराने अलीकडेच तालिबानी दहशतवाद्यांबद्दल ट्विट केले, त्यानंतर ‘#ArrestSwaraBhasker’, ‘#SwaraBhasker’ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. स्वरा भास्करने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ट्विट केले. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. स्वराने अफगाणिस्तानच्या या स्थितीची भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

हेही वाचा :

‘तिची एक गोड तक्रार आणि थेट एक गुलाब नव्हे तर गुलाबांचा वर्षाव..’, ‘मन उडू उडू झालं’मध्ये रंगणार रोमान्सचा खेळ!

‘मिस उत्तराखंड’चा किताब जिंकलीय अभिनेत्री मधुरिमा तुली, अभिनयापूर्वी होती क्रिकेटची आवड!