‘तिची एक गोड तक्रार आणि थेट एक गुलाब नव्हे तर गुलाबांचा वर्षाव..’, ‘मन उडू उडू झालं’मध्ये रंगणार रोमान्सचा खेळ!

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते.

‘तिची एक गोड तक्रार आणि थेट एक गुलाब नव्हे तर गुलाबांचा वर्षाव..’, ‘मन उडू उडू झालं’मध्ये रंगणार रोमान्सचा खेळ!
मन उडू उडू झालं
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 19, 2021 | 8:03 AM

मुंबई : आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून, ही मालिका 30 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. मालिकेच्या या नव्या रोमँटिक प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी ताणली आहे. या फोटोत हृता आणि अजिंक्याचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो :

यात नायिका आपल्या प्रियकराकडे गोड तक्रार करते की, तुझं माझ्यावर प्रेम आहे, असं म्हणतोस ना? पण कधी साधं गुलाबाचं फुल तरी दिलंयस का? यावर नायक म्हणतो, इतकंच ना? आणि तो आपल्या फोनमध्ये काहीतरी करतो. त्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही पाहून नायिका रुसून बसते. इतक्यात तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागतो. वर आभाळात अनेक ड्रोनच्या माध्यमातून तिच्यावर हा पुष्पवर्षाव होत असतो. अर्थात हे त्यानेच केलं असल्याने, नायिका आनंदी होऊन त्याला बिलगते. ‘तिची एक गोड तक्रार आणि थेट एक गुलाब नव्हे तर गुलाबांचा वर्षाव तिच्यासाठी…’, असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

मलिकचे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही, तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही.

‘वेब विश्वात’ हृताचं पदार्पण

कोरोना काळात लोक घरबसल्या ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच सध्या वेब सीरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डुएट’ ही माझी पहिलीच वेब सीरीज असून, या वेब सीरीजबद्दल मी खूप एक्सायटेड आहे, असे हृता दुर्गुळे म्हणाली.

‘कोव्हिडचे सर्वच नियम पाळत अनेक महिन्यांनी शूट सुरु करत आहोत आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांमध्ये आहे. मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडेल’, अशी आशा हृताने व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Pooja Sawant : ‘क्षणभर विश्रांती’ घेत अभिनेत्री पूजा सावंत करतेय धमाल, कॅमेऱ्यात टिपलं अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याचं सौंदर्य

‘मला माझ्यासोबत नाना हवे आहेत!’, ‘आई कुठे काय करते’च्या ‘अनघा’चा ‘हा’ खास टॅटू पाहिलात का?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें