Video | ‘स्पायडरमॅन’ बनून राखी सावंतला करायचीय ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री, ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचं डोकंही चक्रावेल!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 10:50 AM

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) वूटवर सुरू झाला आहे आणि शो चांगलाच पसंत केला जात आहे. अनेक सेलेब्स शोचा एक भाग बनले आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना देखील आवडतायत. करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करत आहे. ‘बिग बॉस 14’मध्ये छाप पाडणारी राखी सावंत (Rakhi Sawant) आता या शोचा देखील एक भाग बनू इच्छित आहे.

Video | ‘स्पायडरमॅन’ बनून राखी सावंतला करायचीय ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री, ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचं डोकंही चक्रावेल!
Rakhi Sawant
Follow us

मुंबई : बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) वूटवर सुरू झाला आहे आणि शो चांगलाच पसंत केला जात आहे. अनेक सेलेब्स शोचा एक भाग बनले आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना देखील आवडतायत. करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करत आहे. ‘बिग बॉस 14’मध्ये छाप पाडणारी राखी सावंत (Rakhi Sawant) आता या शोचा देखील एक भाग बनू इच्छित आहे. ज्यासाठी तिने स्वतः एक वेगळा अवतार धारण केला आहे. राखीच्या नवीन अवताराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘एंटरटेनमेंट क्वीन’ राखी सावंतने शोमध्ये प्रवेश न मिळाल्याबद्दल राग व्यक्त केला आहे. राखीला स्पायडरमॅन पोशाख आणि मेकअपमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात जायचे आहे. या ड्रेस अपसह तिने गळ्यात दोन सोनेरी रंगाच्या मोठ्या माळा देखील घातल्या आहेत.

बिग बॉस ओटीटी सेटच्या बाहेर राखी

या नव्या अवतारात राखी रिअॅलिटी शोच्या सेटच्या बाहेर बॅग घेऊन जाताना दिसली. तिने स्पायडरमॅन लूकमध्ये अनेक पोज दिल्या. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा सिक्युरिटी गार्डने राखीला बिग बॉसच्या घरात प्रवेश करू दिला नाही, तेव्हा ती सेटच्या बाहेर पार्किंग क्षेत्रात आंदोलन करायला बसली. त्यानंतर तिने बिग बॉसला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की, तिला शोमध्ये एंट्री का दिली गेली नाही?

पाहा व्हिडीओ :

बिग बॉसला दिली ऑर्डर

जेव्हा राखी सावंत सेटच्या बाहेर आंदोलनावर बसली होती, तेव्हा राखी सावंत वारंवार बोलत होती की, बिग बॉसने तिला आता आत बोलवावे. ती म्हणाला की, तुम्ही मला वचन दिले होते की, दरवर्षी मला या शोमध्ये आमंत्रित केले जाईल. तिने असेही सांगितले की, तिने शोमध्ये जाण्यापूर्वी ज्वेलरी स्टोअरमधून खरेदी केलेले काही सोने तिच्यासोबत आणले आहे. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी राखीने धारण केलेला हा अवतार पाहून लोक हैराण झाले आहेत. शोचा होस्ट करण जोहर देखील राखीला या अवतारात पाहून थक्क होणार आहे.

सिद्धार्थ आणि शहनाजच्या एन्ट्रीने संतापली

बिग बॉस ओटीटीमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल गेल्यानंतर राखी सावंतने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, ‘अँग्री बिग बॉस ओटीटी..अरे मी खूप रागावले आहे. ये क्या है, शोचे नाव बिग बॉस ओटीटी आहे आणि ओटीटी क्वीनला बोलावण्यात आले नाही. बिग बॉस मी तुझी पहिली पत्नी आहे. मी येतेय…’

हेही वाचा :

पाहिल्याच चित्रपटातून ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानीने मिळवली प्रसिद्धी, आता रमलीय सुखी संसारात!

मखमली शब्दांनी गीत रचणारे गीतकार गुलजार, गीतलेखनाआधी करायचे ‘हे’ काम

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI