AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्पा फॅन्ससाठी पर्वणी! दोन हिरोईन एक सुपरस्टार अन् चंदनाची तस्करी, दिग्गजांचं चेकमेट, कधी रिलीज?

Dhanush new movie om chapter one : या चित्रपटात धनुष अंडरकव्हर मिशनवर असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. साई पल्लवी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून ममूटी, नसीरुद्दीन शाह आणि श्रीलीला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पुष्पा फॅन्ससाठी पर्वणी! दोन हिरोईन एक सुपरस्टार अन् चंदनाची तस्करी, दिग्गजांचं चेकमेट, कधी रिलीज?
Dhanush new movie om chapter oneImage Credit source: social media
| Updated on: Nov 14, 2026 | 5:05 PM
Share

सध्या साऊथ सिनेमांची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आता धनुष आणि ममूटी यांच्या जबरदस्त अभिनयाने सजलेली एक फिल्म येत आहे. ही फिल्म ट्रेलरमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नाव आहे ओएम. धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते अवाक झाले आहेत. दरम्यान, हा चित्रपट सत्य घटनांवरुन प्रेरित असल्याचं सांगण्यात येतंय. कामगार आणि जंगलातील नागरिकांचं होणारं शोषण या फिल्ममध्ये दाखवण्यात येत आहे. लाल चंदनाच्या व्यापारासंबंधी गोष्टही या सिनेमामध्ये दाखवण्यात येणार असल्याचं ट्रेलरमधून दिसून येतंय, पण याचमुळे चाहत्यांना अल्लू अर्जुनत्या पुष्पाची आठवम झाली आहे. पुष्पाच्या दोन्ही पार्टमध्ये लाल चंदनाचा व्यापार दाखवण्यात आलेला आहे. अवैधपणे तो लाल चंदनाचा व्यापार करत असतो. धनुषचा हा सिनेमा ओएम चॅप्टर वन, द ब्लड वुड, हा २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, सिनेमामध्ये दमदार अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. धनुष एका खतरनाक पेचात अडकतो आणि तो अंडरकव्हर मिशनवर असल्याने त्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. ट्रेलरमध्ये तस्करी करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये होणाता तीव्र संघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यामुळेचा प्रक्षकांना अल्लू अर्जुनच्या पुष्पाची आठवण होतेय.

सिनेमाचं कथानक अत्यंत रंजक दिसत असून सिनेमात धनुषसोबत साई पल्लवी आणि सुपरस्टार ममूटी हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. साई पल्लवी ही पोलिस अधिकाऱ्याचं पात्र साकारते आहे. तर ममूटीशिवाय नसीरुद्दीन शाह आणि श्रीलीला देखील सिनेमामध्ये झळकणार आहेत.

ट्रेलरमध्ये चंदनाच्या तस्करीचे काही सीन दिसत असले तरी हा सिनेमा पुष्पापेक्षा अत्यंत वेगळा असल्याचं संपूर्ण ट्रेलरमध्ये दिसून येतंय. तो एका पोलिस अधिकाऱ्याची गुप्त भूमिका साकारत आहे. व्यापारातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी तो त्या तस्करांच्या टोळीमध्ये सामील होतो. ट्रेलरमध्ये तो जंगलात काम करतानाही दिसतो आहे. त्यामुळे हा सिनेमा नेमकं कोणत्या विषयावर भाष्य करणार, याची उत्सुकता शिगेला गेली आहे. साई पल्लवीच्या कणखर पात्रानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!