AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : ‘जलसा’ बंगला जया बच्चन यांच्या नावावर करण्यावरुन अमिताभ यांच्या कुटुंबात वाद, बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीने थेट केली तक्रार

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Controversy : अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील प्रतिष्ठित 'जलसा' बंगल्यावरून कौटुंबिक मालमत्तेचा वाद निर्माण झाला आहे. रमोला यांनी १९९३ मध्ये झालेल्या मालमत्ता हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांचा दावा आहे की, 'जलसा' बंगला जया बच्चन यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय त्यांच्या परवानगीशिवाय घेण्यात आला होता.

Amitabh Bachchan : 'जलसा' बंगला जया बच्चन यांच्या नावावर करण्यावरुन अमिताभ यांच्या कुटुंबात वाद, बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीने थेट केली तक्रार
| Updated on: Nov 14, 2026 | 4:50 PM
Share

अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्यावरून सध्या एक वाद चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ यांच्या पत्नी रमोला बच्चन यांनी १९९३ च्या एका गिफ्ट डिडला आव्हान दिलं आहे. बिग बींच्या वहिनी, रमोला बच्चन यांनी १९९३ च्या गिफ्ट डिडला आव्हान दिलं आहे, ज्याद्वारे ही मालमत्ता जया बच्चन यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली होती. रमोला यांचा दावा आहे की, ‘जलसा’ बंगला जया बच्चन यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेण्यात आला होता.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अमिताभ यांच्या वहिनी, रमोला बच्चन यांनी गेल्या सात महिन्यांत नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, ‘जलसा’ मूळतः त्यांच्या नावावर नोंदणीकृत होता, परंतु नंतर १९९३ च्या गिफ्ट डिडद्वारे तो जया बच्चन यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची तक्रार अंधेरी येथील सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयात दाखल करण्यात आली असून, तिथे सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, सरकारी मालमत्ता नोंदी आणि गृहनिर्माण संस्थेच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळी नावे आढळतात. कापोल गृहनिर्माण संस्थेच्या नोंदींमध्ये जया बच्चन यांचं नाव बंगल्याच्या मालक म्हणून नोंदवलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या मालमत्ता कार्डवर अजूनही रमोला बच्चन यांचं नाव आहे. सरकारी नोंदींमध्ये रमोला यांचं नाव बदलून जया यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.

रमोला यांनी १९९३ मध्ये तयार केलेल्या गिफ्ट डिड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रमोला यांच्या तक्रारीनुसार, हे गिफ्ट डिड साध्या कागदावर तयार करण्यात आलं होतं आणि त्यावेळी स्टॅम्प ड्युटी भरली गेली नव्हती. त्यांनी असाही आरोप केला आहे की, त्यावर साक्षीदारांच्या सह्या नव्हत्या. हे प्रकरण आता अंधेरी येथील सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयात पोहोचलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, उपनिबंधक फयाज मुलानी यांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, सुनावणी सुरू झाली असून संबंधित पक्षांना त्यांचं उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही

या वादावर अमिताभ बच्चन यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या विषयावर जया बच्चन यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्यानं हे एक खाजगी कौटुंबिक प्रकरण असल्याचं सांगून भाष्य करण्यास नकार दिला.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!