Happy Birthday Gulzar | मखमली शब्दांनी गीत रचणारे गीतकार गुलजार, गीतलेखनाआधी करायचे ‘हे’ काम

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला.

Happy Birthday Gulzar | मखमली शब्दांनी गीत रचणारे गीतकार गुलजार, गीतलेखनाआधी करायचे ‘हे’ काम
गुलजार
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 8:54 AM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला. तसेच खूप त्रास देखील सहन करावा लागला.

कुटुंब विभाजित, शिक्षणही सुटलं!

गुलजार लेखक होण्यापूर्वी कार मेकॅनिक होते, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला गुलजार यांच्या जीवनाशी संबंधित काही मनोरंजक किस्से सांगणार आहोत. गुलजार यांचा जन्म ब्रिटिश भारतातील दीना येथील कालरा शीख कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव  पूरन सिंह कालरा होते. परंतु, 1947 मध्ये भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर गुलजार यांचे कुटुंबही विभक्त झाले आणि त्यांना शिक्षण सोडून मुंबईला यावे लागले.

उदरनिर्वाहासाठी केली छोटी कामे

विभाजन झालं, आता समोर जगण्याची समस्या होती, ज्यासाठी उपजीविका आवश्यक होती. गुलजार यांचे शिक्षण अर्धवट सुटले असल्याने, त्यांच्यासाठी कोणत्याही कंपनीत काम मिळवणे सोपे नव्हते, म्हणून त्यांनी मुंबईत छोट्या नोकऱ्या करून उदरनिर्वाह सुरू केला.

कार मेकॅनिक आणि चित्रकार म्हणून केले काम

कदाचित विश्वास बसणार नाही पण, गुलजार यांनी मुंबईतील एका गॅरेजमध्ये कार मेकॅनिक म्हणूनही काम केले. ते बेलासिस रोडवरील एका गॅरेजमध्ये तुटलेल्या वाहनांना वेगवेगळ्या रंगांची टच-अप करायचा.

वडिलांकडून ऐकावे लागले कटू बोल

हळूहळू गुलजार यांना लेखनाची आवड निर्माण झाली आणि त्यांचा कल त्या दिशेने होता. मात्र, गुलजार यांच्या वडिलांना हे आवडले नाही आणि ते त्यांना खूप टोमणे मारायचे. एकदा गुलजार जेव्हा बिमल रॉय आणि शैलेंद्र यांना भेटले, तेव्हा त्यांनी गुलजार यांना चित्रपटांमध्ये काम करण्यास सांगितले आणि तिथेच गुलजार यांचे आयुष्य बदलले.

राखीच्या प्रेमात पकडले गुलजार

गुलजार यशाच्या शिखरावर होते आणि याच दरम्यान अभिनेत्री राखीने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांनी 1973मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी मेघना ठेवले.

लग्नाच्या एक वर्षानंतर गुलजार राखीपासून विभक्त

सगळं सुरळीत सुरु होतं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर राखी आणि गुलजार वेगळे झाले. तेव्हापासून आजपर्यंत गुलजार आणि राखी वेगळे राहत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे दोघांनीही एकमेकांपासून कधीही घटस्फोट घेतलेला नाही.

गुलजार-राखी यांची मुलगी मेघना

वेगळे राहत असले तरी गुलजार आणि राखी यांना अजूनही एकमेकांबद्दल खूप आदर आहे. त्यांची मुलगी मेघना एक सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आहे. नुकताच तिचा ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गुलजार यांना हा चित्रपट खूप आवडला आणि कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांना आपल्या मुलीचा अभिमान आहे.

ऑस्कर, ग्रॅमी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित

आज मितीला गुलजार यांचे कार्य आणि लोकप्रियता यांना प्रस्तावनेची गरज नाही. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, 20 फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्करनेही सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या नावावर ग्रॅमी पुरस्कारही आहे.

हेही वाचा :

‘बॅक ऑन सेट’, राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली!

बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट…

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.