महाराष्ट्राचा लाडका इन्फ्लुएन्सर पोहोचला कृष्णाईच्या खानावळीत; निवेदिता सराफ यांच्यासोबतची रील चर्चेत

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर नंदन कुटे यांचा अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबतची एक रील सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेनिमित्त ही खास रील शूट करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा लाडका इन्फ्लुएन्सर पोहोचला कृष्णाईच्या खानावळीत; निवेदिता सराफ यांच्यासोबतची रील चर्चेत
Nandan Kunte and Nivedita Saraf
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2026 | 3:17 PM

झी मराठी वाहिनीवर आजपासून (15 जून 2026) ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीने केवळ एक आगळावेगळा उपक्रम सादर केला नाही, तर प्रेम, माया आणि आपुलकीचा असा क्षण निर्माण केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली आहेत. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या प्रमोशनसाठी झी मराठीने एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवत महाराष्ट्राचा लाडका इन्फ्लुएन्सर ‘नंदन कुंटे’ याच्यासोबत खास सहयोग साधला. नंदन हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी परिचित आहे. त्याचा निरागस स्वभाव, मनमोकळेपणा आणि “आईच्या हातचं माझ्या आवडीचं” हा त्याचा गाजलेला संवाद घराघरात पोहोचला आहे. त्याच प्रेमळ भावनेला साजेसा असा विशेष व्हिडिओ ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेसाठी तयार करण्यात आला.

या शूटिंगदरम्यान नंदनसोबत काम करण्याचा अनुभव संपूर्ण टीमसाठी अत्यंत सुखद आणि संस्मरणीय ठरला. त्याच्या सहज वागण्याने आणि सकारात्मक ऊर्जेने सेटवरील वातावरण आणखी आनंददायी बनले. मालिकेतील आई-मुलीच्या नात्याची भावना आणि नंदनचा आईविषयीचा जिव्हाळा यामुळे हा व्हिडिओ अधिकच जवळचा वाटला. सोशल मीडियावर ही विशेष रील अपलोड होताच प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. काही क्षणांतच रील व्हायरल झाली आणि अवघ्या एका तासाच्या आत 1200 हून अधिक कमेंट्सद्वारे आणि 17k शेअरद्वारे प्रेक्षकांनी आपले प्रेम व्यक्त केलं.

पहा व्हिडीओ

अनेकांनी नंदनच्या निरागसतेचं कौतुक करत मालिकेबद्दलची उत्सुकता देखील व्यक्त केली. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका नात्यांमधील जिव्हाळा, संघर्ष आणि प्रेमाची सुंदर कहाणी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या मालिकेच्या प्रवासाची सुरुवात नंदन सारख्या लाडक्या व्यक्तिमत्त्वासोबत झाल्याने टीम अत्यंत आनंदात आहे. हा विशेष उपक्रम प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेला असून ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेला मिळालेल्या या प्रेमळ प्रतिसादामुळे संपूर्ण टीम उत्साहित झाली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका 15 जूनपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही एका आई आणि तिच्या तीन मुलींची हृदयस्पर्शी कथा आहे. कुटुंब, नाती, संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ यांची गोष्ट सांगणारी ही मालिका कोल्हापूरच्या कृष्णाईच्या मातीत चित्रित झाली आहे. या मालिकेत एकता लब्दे (शारदा), ट्विंकल यादव (गौरी), नारायणी वर्ने (सौदामिनी), रोहित परशुराम (शंकर), स्मिता सरवदे (सत्यभामा) आणि निवेदिता सराफ (कृष्णाई) यांच्या भूमिका आहेत.

Follow Us