Rise And Fall 2 चा सर्वात महागडा स्पर्धक, गौतम गुलाटी एका आठवड्यासाठी किती घेतो फी ?

Rise And Fall 2: अभिनेता हा बिग बॉसनंतर लौकरच 'राइज अँड फॉल 2' या म शोमध्ये दिसणार आहे. या शोसाठी त्याला सर्वात जास्त फी मिळत्ये. किती आहे त्याचं मानधन ?

Rise And Fall 2 चा सर्वात महागडा स्पर्धक, गौतम गुलाटी एका आठवड्यासाठी किती घेतो फी ?
| Updated on: Sep 26, 2026 | 5:56 PM

Rise And Fall 2: टीव्ही अभिनेता गौतम गुलाटी (Gautam Gulati) हा Rise And Fall Season 2 या शोसोबत याच जॉनरमध्ये पुनरागमन करणार आहे. आज, 26 सप्टेंबरपासून हा शो अमेझॉन प्राईमवर हा शो सुरू होणार आहे. बिग बॉस सारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसलेला गौतम त्या काळात बराच चर्चेत होता . दमदार पर्सनॅलिटीमुळे त्याने अनेक लोकांचं मन जिकलं . एवढंच नव्हे तर बिग बॉस जिंकत ट्रॉफीवरही नाव कोरलं होतं. आता तो राइज अँड फॉल 2 मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा रिॲलिटी शोमध्ये पाहण्यास चाहते चांगलेच उत्सुक आहत.

गौतमव्यतिरिक्त या शोमध्ये अनेक मोठे चेहरे पण दिसणार आहेत. पण या शोसाठी गौतमला सर्वात जास्त मानधन दिलं जात आहे. हो, हे खरं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम या शोमधील सर्वात महागडा स्पर्धक आहे आणि त्याला मोठी रक्कम देण्यात येणार आहे. त्याला नेमकी किती मिळणार फी ?

एका आठवड्यासाठी लाखो चार्ज करतोय गौतम

शोशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गुलाटी याला ‘Rise & Fall 2’चा भाग होण्यासाठी दर आठवड्याला तब्बल 45 लाख रुपये मानधन मिळतयं. या फीमुळे तो शोमधील सर्वाधिक फी घेणारे स्पर्धक ठरला आहे. या शोमध्ये स्वरा भास्कर, करण पटेल, तेज प्रताप यादव आणि प्रियंका चाहर चौधरी यांसारखे अनेक बडे सेलिब्रिटीही सहभागी आहेत.

 

‘Rise & Fall 2’मध्ये गौतम गुलाटी यांची एंट्री होण्यापूर्वी त्याला आणखी दोन रिॲलिटी शोच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, त्याने त्या दोन्ही शोमध्ये काम करण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, गौतमला ‘Roadies’मध्ये गँग लीडर होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली. याशिवाय ‘The Traitors’च्या आगामी सीझनमध्ये स्पर्धक म्हणून त्याच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र, गौतम या शो मध्येही सहभागी झाला नाही.

टीव्हीपासून सुरू केला प्रवास

गौतम गुलाटी याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. हिंदी मालिकांसोबतच त्याने चित्रपट आणि विविध रिॲलिटी शोमध्येही काम केलं आहे. ‘कहानी घर घर की’, ‘कसम से’ आणि ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांचा तो भाग होता. मात्र, ‘दिया और बाती हम’ या मालिकेतील विक्रम राठी या भूमिकेमुळे त्याला मोठी ओळख मिळाली. या मालिकेतील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली पसंती लाबली आणि त्याची फॅन फॉलोइंगही मोठ्या प्रमाणात वाढली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us