Gautami Patil : आईला मारहाण तर माझ्यावर संशय, फक्त पैशांसाठी…, वडिलांबद्दल गौतमी पाटीलचा मोठा खुलासा
Gautami Patil : गौतमी पाटील हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गौतमीला तिच्या डान्सने एक वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. पण गौतमी दुसरी बाजू कोणालाच माहिती नाही. गौतमी हिने नुकताच तिच्या आयुष्याचा मोठा खुलासा केला.

Gautami Patil : गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर असंख्य लोकांची गर्दी जमते. महिला वर्ग आणि लहान मुलं देखील तिच्या कार्यक्रमासाठी उत्सुक असतात. स्टेजवर गौतमी आली की, टाळ्यांचा कडकडाट होतो. आज गौतमी हिला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. पण तिच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. परिस्थिती बिकट असल्यामुळे गौतमी फक्त 10 वीच शिकली, त्यात वडिलांची नसलेली साथ गौतमी आणि तिच्यासाठी आईसाठी फार मोठी संघर्ष होता. नुकताच गौतमी हिने तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला.
बिकट परिस्थिती आणि वडिलांबद्दल सांगताना गौतमी म्हणाली, मी 16 वर्षांची असेल, खूप लहान होते मी, माझे वडील आमच्यासोबत राहिले नाही. त्यांना दारुचं व्यसन होतं. रोज ड्रिंक करायचे, आईला मारत होते मी देखील पाहत होती. माझ्यावर देखील काही गोष्टींचा संशय माझ्या वडिलांनी घेतला. प्रत्येक वेळेस ते माझ्यावर आणि आई संशय घेत होते. पण पैशांमुळे देखील गोष्टी घडल्या.
पुढे गौतमी म्हणाली, ‘माझं शिक्षणच झालं नाही. मी फक्त दहावीच शिकले. मला यातून 500 रुपये मिळत आहे, मला यातून 1000 रुपये मिळत आहेत… म्हणून मला काम करायचं आहे. फक्त एवढंच डोक्यात होतं. मी काय करत आहे, याच्याशी मला काहीही घेणं – देणं नव्हतं. मला फक्त एवढंच पाहायचं होतं माझ्या घरात पैसे कसे येत आहेत.’, असं देखील गौतमी म्हणाली.
एकेकाळी गरिबी अनुभवलेली गौतमी आज मात्र आनंदी आयुष्य जगत आहे. एका कार्यक्रमासाठी गौतमी अंदाजे 3 – 5 लाख रुपये घेते. अनेक गाण्यांमध्ये देखील गौतमी झळकली आहे. सिनेमात देखील गौतमीने पदार्पण केलं आहे. यामुळे तिच्या मानधनात देखील मोठी वाढ झाली आहे. गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करते.
सोशल मीडियावर देखील गौतमी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी गौतमी कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील गौतमीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.