13 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत थाटला संसार, दुसरी बायको म्हणून सवतीच्या दारात…, नवऱ्याच्या निधनानंतर तर…

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीने 13 वर्ष मोठ्या आणि चार मुलांच्या बापासोबत लग्न तर केलं, पण सवतीच्या घरात कधीच पाऊल ठेवलं नाही. लग्नाला 44 वर्ष झाल्यानंतर देखील अभिनेत्रीने मुख्य घरात कधी प्रवेश केलाच नाही, पण नवऱ्याच्या निधनानंतर तर...

13 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत थाटला संसार, दुसरी बायको म्हणून सवतीच्या दारात..., नवऱ्याच्या निधनानंतर तर...
Hema Malini
| Updated on: Oct 16, 2026 | 3:26 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी विवाहित आणि स्वतःपेक्षा मोठ्या सेलिब्रिटींसोबत लग्न केलं. तर काही अभिनेत्यांनी तर पहिल्या बायकोला घटस्फोट न देता समाजाचे सर्व नियम मोडत दुसरा संसार थाटला.. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आहे. अभिनेत्री 13 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न केलं, पण सवतीच्या दारात कधी पाय ठेवलाच नाही. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री हेमा मालिनी आहेत. हेमा मालिनी यांनी कुटुंबियांच्या विरोधात जात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. पण तेव्हा धर्मेंद्र यांचं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं आणि त्यांना चार मुलं देखील होतं. पण तेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्यासाठी खास स्थान होतं. अखेर समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

Loading...

रिपोर्टनुसार, लग्नानंतर हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या मुख्य घरी कधी गेल्याच नाहीत. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास 40 वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. 74 वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये खुलासा केला.

सांगायचं झालं तर, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, जेव्हा धर्मेंद्र शेवटच्या घटका मोजत होते, तेव्हा त्यांचे उपचार मुख्य घरी सुरु होते, तेव्हा हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना भेटता देखील आलं, जेव्हा धर्मेंद्र यांच्या निधनाचील बातमी समोर आली, तेव्हा हेमा मालिनी स्मशानभूमीत पोहोतल्या. आता हेमा मालिनी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे,

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये दोघांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाच्या कोणत्याच कार्यक्रमात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली नसतात. चाहत्यांमध्ये देओल कुटुंबामध्ये कायम चर्चा रंगलेल्या असतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us