Orry Injured : ऑरीचं शरीर काळंनिळं पडलं, संपूर्ण अंगावर जखमा, केले धक्कादायक फोटो शेअर; म्हणाला स्वत:ला मृत्यूसमोर…
ऑरीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एकूण सात फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या हातांना, दंडाला मार लागल्याचं दिसतंय. त्याचं शरीर लाल निळं पडल्याचं दिसतंय.

प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर आणि नेहमीच लाईमलाईटमध्ये असणारा ओरहान अवतरामानी अर्थात ऑरी याला संपूर्ण देश ओळखतो. बॉलिवूडमध्ये टॉपच्या सेलिब्रिटींसोबत त्याची उठबस असते. सोशल मीडियावर त्याची फॅनफॉलोविंगही चांगलीच मोठी आहे. दरम्यान, हाच ऑरी आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्याचं काळंनिळं पडलेलं अंग दाखवलं आहे. हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यायत.
ऑरीने पोस्टमध्ये नेमकं काय सांगितलं?
ऑरीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एकूण सात फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या हातांना, दंडाला मार लागल्याचं दिसतंय. त्याचं शरीर लाल निळं पडल्याचं दिसतंय. हेच फोटो पाहून त्याचे अनेक चाहते चिंतेत पडले आहेत. ‘आजच्या स्टंटमध्ये आज या जखमा झाल्या आहेत,’ असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. सोबतच त्याने मृत्यू आणि जीवन याबाबत बरंच काही सांगितलंय. तसेच स्वत:ला मृत्यूसमोर ठेवून आपण परत येऊ शकतो का हे पाहणं विशेष आहे, असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
ऑरीच्या अंगावर जखमा नेमक्या कशाच्या?
ऑरीच्या या जखमा पाहून त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय. या जखमा नेमक्या कशाच्या आहेत, असं अनेकांनी विचारलंय. सध्या ऑरी खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. या शोमध्ये अनेक थरारक स्टंट करावे लागतात. याच स्टंटदरम्यान त्याला या जखमा झाल्या आहेत. शेवटी #KhatronKeKhiladi असा हॅशटॅग देऊन त्याने तसे सूचित केले आहे
दरम्यान, ऑरीने हे फोटो शेअर केल्यानंतर खतरों के खिलाडी या शोचीही चर्चा सुरू झालीय. आता या शोची अंतिम फेरी सुरू आहे. ऑरी या फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्याच्यासोबत अविनाश मिश्रा, फरहाना भट्ट, करण वाही, ऋत्विक धनजानी, रुबिना दिलैक आणि हर्ष गुजराल हे या सीझनचे इतर सहा फायनलिस्ट म्हणून निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता या शोमध्ये ऑरी काय कमाल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.