ज्यांची नजर खराब, त्यांचं काय करू शकतो? इंटिमेट सीन्सच्या लीकवर राधिका मदान-विजय वर्मा स्पष्टच बोलले

‘लस्ट स्टोरीज 3’ मधील इंटिमेट सीन्सच्या संभाव्य लीकवर राधिका मदन आणि विजय वर्मा यांनी भाष्य केलं. राधिका मदन म्हणाली की, असे प्रकार कलाकारांच्या नियंत्रणाबाहेर असतात, तर विजय वर्मा याने काम करताना प्रेक्षकांची नजर मनातून दूर ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

ज्यांची नजर खराब, त्यांचं काय करू शकतो? इंटिमेट सीन्सच्या लीकवर राधिका मदान-विजय वर्मा स्पष्टच बोलले
| Updated on: Sep 28, 2026 | 4:58 PM

काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘पार्च्ड’ चित्रपटातील इंटिमेट सीनचा व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यामुळे मोठा धक्का बसला होता, मी घाबरले होते, असा खुलासा अभिनेत्री राधिका आपटेने नुकताच केला होता. आता ‘लस्ट स्टोरीज 3’मध्ये काम करणारी अभिनेत्री राधिका मदन आणि अभिनेता विजय वर्मा या दोघांनीही त्यांचे इंटिमेट सीन्स तसेच काही व्हिडीओ लीक होण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं. ‘लस्ट स्टोरीज 3’ मध्ये मानवी इच्छा, लैंगिकता, प्रेम आणि आधुनिक नातेसंबंध यावर स्पष्टपणे भाष्य करण्यात आलं आहे.

काहीच करता येत नाही — राधिका मदान

Loading...

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राधिका मदान ही इंटिमेट सीन्सचे व्हिडीओ लीक होण्याच्या शक्यतेवर बोलली. अशा प्रकारच्या घटना कलाकारांच्या नियंत्रणाबाहेर असतात, त्यामुळे त्याबद्दल सतत विचार करत राहण्यात अर्थ नाही, असं तिने सांगितलं. कलाकार हा आपल्या कामामागचा हेतू आणि दिग्दर्शकाचा दृष्टिकोन यावर विश्वास ठेवू शकतो. त्यानंतर आपलं काम प्रामाणिकपणे करून पुढे जाणं गरजेचं, असं ती म्हणाली.

‘लस्ट स्टोरीज 3’मध्ये राधिका मदानने अली फजलसोबत इंटिमेट सीन शूट केला. अशा प्रकारचे सीन्स करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच मी काम करते, असंही तिने स्पष्ट केलं.

ज्यांची नजर खराब..

“ज्यांची नजर खराब आहे, त्यांचं आपण काय करू शकतो? हे सगळं करू नका, असं तर आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगू शकत नाही ना. अशा वेळेला तुम्ही खरंच काहीही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही इंटिमेट सीन करता, तेव्हा तो लीक होण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवावं लागतं. हा धोका आहे हे माहीत असतानाच तुम्ही त्या सीनमध्ये उतरता आणि तो लीक होऊ नये अशी मनात आशा करत असता,” असंही राधिकाने पुढे नमूद केलं.

सीन शूट करताना प्रेक्षकांची नजर मनातून दूर ठेवावी लागते

इंटिमेट सीन शूट करताना जो मानसिकर दबाव योतो, त्याबद्दल अभिनेता विजय वर्माही बोलला. ‘लस्ट स्टोरीज 2’मधील एका स्टोरीमध्ये त्याने त्याची तेव्हाची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियासोबत, एक इंटिमेट सीन केला होता. या सीनमधील क्लिप्स ऑनलाइन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र, अशा प्रकारचे सीन्स शूट करताना संभाव्य प्रतिक्रिया आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचा विचार मनातून बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे, असं विजय म्हणाला.
ठेवणे आवश्यक असल्याचे विजयने सांगितलं. “ अशा प्रकारचे सीन्स शूट करताना कलाकाराला प्रेक्षकांची नजर मनातून पूर्णपणे दूर ठेवता आली पाहिजे. या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट होऊ शकतात, हे आपल्याला माहीत असतं. हेच सध्याचं वास्तव आहे. काही गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही,” असं यावर विजय म्हणाला. “ या सगळ्या विचारांना जर मी मनातून दूर करू शकलो नाही, तर मला माझं काम करताच येणार नाही. एक अभिनेता म्हणून मला नवीन सीमा ओलांडत काम करायचं असेल, तर हे आवश्यक आहे,” असंही म्हणत त्याने आपलं मत मांडलं.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us