Katrina Kaif: आलिया, बिपाशानंतर आता कतरिना कैफ देणार गुड न्यूज?

| Updated on: Nov 15, 2022 | 2:50 PM

कतरिना कैफ गरोदर? जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य

Katrina Kaif: आलिया, बिपाशानंतर आता कतरिना कैफ देणार गुड न्यूज?
कतरिना कैफ
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्रीतून सध्या एकानंतर एक ‘गुड न्यूज’ मिळत आहेत. आधी अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिला. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बासूला कन्यारत्न प्राप्त झालं. आता कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे कतरिनाचा व्हायरल झालेला फोटो. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप पहायला मिळतोय. म्हणूनच कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

कतरिनाने नोव्हेंबर 2021 मध्ये अभिनेता विकी कौशलशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनीही आपलं रिलेशनशिप माध्यमांपासून लपवलं होतं. लग्नानंतर लगेचच कतरिनाने ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. श्रीराम राघवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. याच चित्रपटाच्या सेटवरील कतरिनाचा फोटो व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओमध्ये कतरिनाचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळत होता. मात्र या फोटोमागचं सत्य आता समोर आलं आहे. कतरिना गरोदर नसून ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात ती प्रेग्नंट महिलेची भूमिका साकारतेय. म्हणूनच तिने असा लूक केला होता. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचीही भूमिका आहे.

याआधी ऑगस्टमध्येही कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. एका क्लिनिकमधून विकी आणि कतरिना बाहेर येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली. सध्या विकी आणि कतरिना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत. ‘मेरी ख्रिसमस’शिवाय ती ‘टायगर 3’मध्येही झळकणार आहे.

‘टायगर 3’मध्ये पुन्हा एकदा कतरिना आणि सलमान खानची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. कतरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.