
Best Comedy Movies of All Time: काही वेळा मूड खराब असला तर काहीच काम होत नाही. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. काही कॉमेडी चित्रपट तुमचा मूड चांगला फ्रेश करतील. यातील काही चित्रपट तुम्ही जरी पाहिले असले तरी पुन्हा तुम्हाला हसायला लावतील. बॉलीवूड आणि हॉलीवूडचे हे काही चित्रपट ऑल टाईम हिट आहेत.हे चित्रपट तुमच्या आवडत्या यादीत असतीलच… यात सात चित्रपटातील काही युट्युबवरही मोफत उपलब्ध आहेत.
हा चित्रपट जवळपास सर्वांनी पाहिले असतील. दोन मित्र फरहान आणि राजूची ही कहाणी असून ते त्यांच्या हरवलेला मित्र रँचोच्या शोधासाठी निघतात. रस्त्यात त्यांना कॉलेजचे दिवस आठवतात आणि हा चित्रपट पुढे सरकू लागतो. कठोर शिस्तीचा प्रिन्सिपल,अभ्यासाचा दबाव आणि रँचोचा अभ्यासाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोण आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अंदाज तुम्हाला आवडेल. मैत्री, प्रेम समाजाच्या दांभिकपणावर केलेले भाष्य हा या चित्रपटाचा युएसपी आहे.
चार मित्र बॅचरल पार्टीसाठी लास वेगासला जाताता. परंतू दुसऱ्या सकाळी त्यांना गेल्या रात्रीचे काही आठवत नाही. हॉटेलच्या खोलीत अजब परिस्थिती, बाथरुममध्ये वाघ आणि वर गायब ! लग्नाआधी आपल्या मित्राला शोधण्याची धडपड मजेदार घटनांनी भरलेली आहे. चित्रपटाचा वेग आणि मजेशीर सीनमुळे हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमचा मूड चांगला करेल.
दोन गँगस्टर भाऊ त्यांच्या बहिणीचे लग्न एखाद्या सभ्य मुलाशी करु इच्छीत आहेत. परंतू मुलाला गुंडांपासून दूर रहायचे आहे. यानंतर सुरु होते खोटे, गैरसमज आणि वेडसरपणाने भरलेली कॉमेडी. उदय शेट्टी आणि मजनू भाई या चित्रपटाची शान आहे. डायलॉग देखील प्रसिद्ध झाले आहेत की आजही हसू येते. कोणी हा चित्रपट पाहिला नसेल तर याचे डायलॉग नक्की ऐकले असतील.
मिस्टर बिन सुट्टी एन्जॉय करण्यासाठी फ्रान्सला जातात. परंतू त्यांचा प्रवास मजेदार अडचणींना खुमासदार बनतो. सामान हरवणे, गैरसमज आणि अजाणता एका मुलाला ‘किडनॅप’ करण्यासारखे आहे. सर्वकाही खूपच हास्यस्पद पद्धतीने होत रहाते. कोणताही डायलॉग नसतानाही हा चित्रपट तुम्हाला प्रचंड हसवतो.
मुंबईतील एक गँगस्टर त्याच्या वडीलांना आनंदी करण्यासाठी स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगतो. त्यासाठी नाना करामती करतो. मित्र ‘सर्कीट’ सोबत करामती करतो. हा चित्रपट हसवण्याबरोबर सामाजिक संदेश देखील देतो.
8 वर्षाचा केविन घरच्यांचा चुकीने घरात एकटाच राहिला जातो. घरातले सुट्टीवर परदेशात जातात. सुरुवातीला तो लहानगा केविन त्याचा एकटेपणा एन्जॉय करतो. परंतू दोन चोर या घरात शिरण्याचा प्रयत्न करतात. या चोरांची लहानगा केविन कशी जिरवतो याचे सुंदर चित्रण या चित्रपटात आहे.
तिघे बरोजगार तरुण पैशांच्या तंगीमुळे अडचणीत असतात. एकदा राँगनंबर लागल्याने एका किडनॅपरचा कॉल ते ऐकतात. नंतर खंडणीचा पैसा स्वत:कडे ठेवण्याची योजना आखतात. यातील बाबूराव आपटे आणि राजू, श्याम यांच्या त्रिकुटाने हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडतो.