Janhvi Kapoor : बॉयफ्रेंड असावा तर असा! श्रीदेवींच्या निधानानंतर जान्हवीसाठी शिखर पहारियानं केलेलं असं काही की…; अभिनेत्रीचा खुलासा

Janhvi Kapoor : २०१८ मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यावेळी शिखर पहारिया जान्हवी कपूरच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. याबद्दल जान्हवीनं एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

Janhvi Kapoor : बॉयफ्रेंड असावा तर असा! श्रीदेवींच्या निधानानंतर जान्हवीसाठी शिखर पहारियानं केलेलं असं काही की...; अभिनेत्रीचा खुलासा
| Updated on: Oct 27, 2026 | 5:20 PM

‘कॉफी विथ करण’च्या ९ व्या सीझनच्या आगामी भागात जान्हवी कपूर वरुण धवनसोबत सहभागी होणार आहे. यादरम्यान, जान्हवीनं तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.जान्हवीनं सांगितलं की, ज्यावेळी श्रीदेवी यांचं निधन झालं, तेव्हा जान्हवीच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात शिखर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्यावेळी ते एकमेकांना डेट करत नव्हते.

काय म्हणाली जान्हवी कपूर?

Loading...

फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्यानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. करण जोहर म्हणाला की, त्या काळात शिखरनं जान्हवीला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, त्या वेळी लंडनमध्ये शिकत असलेला शिखर, तिची साथ देण्यासाठी आपला अभ्यास काही काळासाठी थांबवून मुंबईत आला होता. तिनं सांगितलं की, तिला खूप नंतर समजलं की, गरज पडल्यास तिला मदत व्हावी म्हणून तो महिनाभर जुहूमध्ये आपल्या एका मित्राच्या घरी राहिला होता.

जान्हवी म्हणाली की, ‘शिखर लंडनमध्ये शिकत होता आणि त्यानं कॉलेजला सुट्टी घेतली होती. तो मुंबईत आला आणि तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत राहत होता. पण मला खूप नंतर कळलं की, तो महिनाभर जुहूमध्ये आपल्या मित्राच्या घरी राहिला होता. असं नाही की, मी त्याला दररोज भेटत होते, पण नंतर मला समजलं की, त्याने विचार केला होता, ‘नाही, जर तिला माझी गरज पडली, तर मी तिच्या जवळ असायला हवं.’

२०२४ मध्ये, जान्हवी तिची बहीण खुशी कपूरसोबत ‘कॉफी विथ करण’मध्ये आली होती. तेव्हा आपल्या आईच्या निधनाची बातमी समजली त्या रात्रीची आठवण सांगताना ती भावूक झाली होती. ‘जेव्हा मला तो फोन आला, तेव्हा मी माझ्या खोलीत होते. मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला आणि मी रडत-ओरडतच तिच्या खोलीत शिरले. पण मला एक गोष्ट स्पष्ट आठवतेय,तिनं जसं माझ्याकडे पाहिलं, तसं तिनं रडणं थांबवलं. तिनं अगदी अचानक रडणं थांबवलं, माझ्या शेजारी बसली आणि मला धीर देऊ लागली. त्यानंतर तिला या गोष्टीवरून पुन्हा कधीही रडताना मी पाहिलेलं नाही.’

दरम्यान, ‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत, जान्हवीनं शिखरसोबतच्या आपल्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलेलं. ‘तो माझ्या आयुष्यात तेव्हापासून आहे, जेव्हा मी १५-१६ वर्षांची होते. मला वाटतं, माझी स्वप्ने हीच त्याची स्वप्ने राहिली आहेत आणि त्याची स्वप्ने हीच माझी स्वप्ने राहिली आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आम्ही एकमेकांचा आधार आहोत.’ अस जान्हवी म्हणालेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us