एका रात्रीत 7 लाख मिळतील… थोडी तडजोड करशील तर…, ‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्रीकडे पुरुषांची अजब मागणी

एका रात्रीत 7 लाख मिळतील... थोडी तडजोड करशील तर..., 'जोधा अकबर' फेम अभिनेत्रीकडे इंडस्ट्रीतील पुरुषांनी विचित्र मागणी केली तेव्हा..., सत्य अखेर समोर...

एका रात्रीत 7 लाख मिळतील... थोडी तडजोड करशील तर..., जोधा अकबर फेम अभिनेत्रीकडे पुरुषांची अजब मागणी
Lavina Tandon
| Updated on: Jun 09, 2026 | 8:36 AM

टीव्ही इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड एवढंच नाही तर, साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील सर्वात जुना आणि कायम चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे कास्टिंग काऊच… ज्यावर सुरु असलेले वाद अद्यापही शमलेले नाहीत. अभिनेत्री कायम त्यांना आलेला वाईट अनुभव शेअर करताना दिसतात. धक्कादायक सत्य म्हणजे, फक्त अभिनेत्रीच नाही तर, अभिनेत्यांना देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. आता देखील ‘जोधा अकबर’ फेम लवीना टंडन हिने अनेक वर्षांनंतर कास्टिंग काऊचबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. लवीना हिने कास्टिंग काऊचचा सामना दोन वेळा केला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला, थोडी तडजोड करशील तर, 7 लाख रुपये मिळतील… असं देखील सांगण्यात आलेलं.

सांगायचं झालं तर, लवीना टंडन हिने ‘जोधा अकबर’ या मालिकेत रुकैय्या बेगम या भूमिकेला न्याय दिलेला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका टॉक शोमध्ये अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल आलेला अनुभव सांगितला. लवीना टंडन म्हणाली, ‘आपली इंडस्ट्री दिसायला प्रचंड ग्लॅमरस आहे. पण कास्टिंग काऊचमुळे प्रचंड बदनाम आहे. लोकांना चांगल्या भूमिका मिळतात, पण त्या बदल्यात त्यांनी काहीतरी करावं लागतं… इतक्या वर्षांमध्ये माझ्यासोबत असं दोन वेळा झालं आहे, जेथे मला थेट विचारण्यात आलं होतं की, तडजोड करणार का?’

‘साऊथ इंडस्ट्रीतील कोण्या कास्टिंगवाल्याने मला फोम केलेला आणि प्रचंड शिस्तीशीर मला सांगितलं होतं, सिनेमाचं शुटिंग आहे. 15 – 20 नाही तर, 10 – 15 दिवसांचं शुटिंग असणार आहे. त्यासाठी तुला 5 लाख रुपयांचं मानधन मिळेल. पण तडजोड केलीस तर, 7 लाख रुपये मिळतील. मी देखील त्यांना स्पष्टपणे उत्तर दिलं, तुमचे आभार आहेत, तुम्ही माझा विचार केलात आणि तुमच्या प्रामाणिकपणासाठी… पण हे सर्व मी करत नाही. जर तुमच्याकडे आणखी कोणत्या ऑफर्स असतील तर, मला फोन करु नका. यापेक्षा वेगळं काही असेल तर, संपर्कात राहा…’

एवढंच नाही तर, दुसऱ्यांदा आलेल्या अनुभवाबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं. ‘हे नुकताच झालं होतं. मला फार सहजपणे सांगण्यात आलेलं की, असं तर अनेक अभिनेत्री करतात. यावर माझं उत्तर होतं की, मला करायचं असतं तर मी फार स्पष्टपणे बोलली असती की, मला चालेल, मी करेल… पण करियरच्या या टप्प्यावर आल्यानंतर मी असं का करु? मी कोणत्याच टप्प्यावर असं करणार नाही. काही गोष्टींना नकार असेल तर, कोणी बळजबरी करु शकत नाही… नाहीचा अर्थ नाहीच असतो…’ असं देखील लवीना म्हणाली.

लवीना हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘कभी खुशी कभी धूम’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘दिल मिल गए’, यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेत रुकैय्या बेगम या तिने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता लवीना ‘अनदेखी 4’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे.

Follow Us