
अभिनेत्री आणि मॉडल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी अचानक निधन झालं. तिच्या मृत्यूने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. फॅन्सपासून तमाम सेलिब्रिटींचा या बातमीवर विश्वास बसत नाहीय. या शॉकिंग न्यूजनंतर कांटा लगा स्टार शेफाली जरीवालाचा एक जुना इंटरव्यू व्हायरल होतोय. यात तिने आपल्या आरोग्याच्या समस्या आणि करिअरमध्ये मागे पडण्याच्या कारणांचा खुलासा केलाय. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये शेफाली जरीवालाने खुलासा केलेला की, ती वयाच्या 15 व्या वर्षापासून आकडीच्या त्रासाने पीडित होती. तिने सांगितलं की, “मला वयाच्या 15 व्या वर्षी आकडी आली. त्यावेळी अभ्यासात चांगले गुण मिळवण्याचा माझ्यावर दबाव होता. तणाव आणि चिंतेमुळे आकडीचे अटॅक येऊ शकतात. हे आपसात संबंधित आहेत. तुम्हाला डिप्रेशनमुळे आकडी येऊ शकते”
या सिच्युएशनमध्ये आत्मविश्वास आणि काम करण्याच्या क्षमतेला कसं प्रभावित केलं, त्याबद्दल शेफाली मोकळेपणाने बोललेली. “मला वर्गात, स्टेजच्या मागे, कुठेही आकडीचे अटॅक येऊ शकतात. त्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झालेला”
मला माहित नसायचं की, पुढचा…
“कांटा लगा गाणं केल्यानंतर लोकांनी मला विचारलं, मी जास्त काम का करत नाही. पण खरं कारण हे होतं की, आकडीच्या समस्येमुळे मी जास्त काम करु शकत नव्हती. मला माहित नसायचं की, पुढचा अटॅक मला कधी येईल”
इमोशनल सपोर्टमुळे हे शक्य झालेलं
याच इंटरव्यूमध्ये तिने अभिमानाने सांगितलेलं की, “मागच्या नऊ वर्षांपासून ती आकडी मुक्त झाली आहे. तिला आता असे अटॅक येत नाहीत” इमोशनल सपोर्टमुळे हे शक्य झाल्याच तिने सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली की, “मला स्वत:वर गर्व आहे. मी माझं डिप्रेशन, पॅनिक अटॅक आणि एंग्जायटीला नैसर्गिक मजबूत सपोर्ट सिस्टिमच्या मदतीने मॅनेज केलय”
सध्या मृत्यूच कारण काय?
शेफाली जरीवालाच शुक्रवारी निधन झालं. सध्या कार्डियक अरेस्ट तिच्या मृत्यूच कारण सांगितलं जातय. शेफालीला नवरा पराग त्यागी आणि अन्य लोक बेलेव्यू मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात घेऊन आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला. कुटुंबाने अजूनपर्यंत कुठलं ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेलं नाही.