‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्री वेश्याव्यवसायात अडकली तेव्हा… तुरुंगवास तर भोगलाच, पण नवऱ्याने देखील…

झगमगत्या विश्वातील अशी एक अभिनेत्री जिने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. पण हॉटेलमध्ये नकोत्या अवस्थेत अभिनेत्रीला पकडल्यानंतर, ती वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकली... अनेक संकटांचा सामना केल्या आज असं आयुष्य जगत आहे अभिनेत्री...

कहानी घर घर की फेम अभिनेत्री वेश्याव्यवसायात अडकली तेव्हा...  तुरुंगवास तर भोगलाच, पण नवऱ्याने देखील...
अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद
| Updated on: Jun 07, 2026 | 9:24 AM

सध्या अशा अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे जिने बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. तिने ‘मकडी’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर अभिनेत्रीने टीव्ही क्वीन एकता कपूर हिच्या ‘कहानी घर घर की’ मालिकेत देखील भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर, तिने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ही अभिनय विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्वेता बासू आहे. श्वेता हिने ‘इक्बाल’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’, ‘डरना जरुरी है’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

आज श्वेता  हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण श्वेता हिच्या आयु्ष्यात एक वळण असं आलं, जेव्हा अभिनेत्रीला तुरुंगवास भोगावा लागला. हैदराबाद येथील पंचतारांकीत हॉटेलमधून अभिनेत्री अटक करण्यात आलेली. तिच्यावर वेश्याव्यवसाय करत असल्याचे देखील आरोप होते.

रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2014 मध्ये, श्वेता हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील एका हॉटेलमध्ये राहत होती. पोलिसांनी अचानक हॉटेलवर छापा टाकला आणि वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अभिनेत्रीला अटक केली. तिने दोन महिने एका बचावगृहात घालवले. डिसेंबर 2014 मध्ये, हैदराबाद सत्र न्यायालयाने तिला निर्दोष ठरवलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले.

पण श्वेता हिच्या आयुष्यातील वाईट दिवस येथेच संपले नाहीत. या घटनेनंतर अभिनेत्रीच्या प्रोफेशनल आयुष्यात तर मोठं संकट आलंच, पण खासगी आयुष्यात देखील श्वेता हिने अनेक उतार – चढाव पाहिले. 2018 मध्ये श्वेता हिने लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न 1 वर्ष देखील टिकलं नाही. अखेर अभिनेत्री नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये श्वेता हिचा घटस्फोट झाला. श्वेता हिने दिग्दर्शक रोहित मित्तल याच्यासोबत लग्न  केलं होतं.

घटस्फोटानंतर श्वेता खचली नाही तर, तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली. श्वेता हिने पुन्हा अभिनय विश्वात दमदार कमबॅक केलं… आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर देखील श्वेता कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

 

 

Follow Us