Kavya Anirudh Marriage : अनिरुद्ध-काव्या मारन गुपचूप करायचे डेट, फोटो झालेले व्हायरल, दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले?

दोघेही डेट करत असल्याचे समोर येताच तेव्हा अनिरुद्ध याने प्रतिक्रिया दिली होती. आम्ही लग्न करणार नाहीत. अफवा पसरवणे बंद करा, असे त्याने त्यावेळी सोशल मीडियावर सांगितले होते. अनिरुद्धच्या काकांनीच या वर्षी दोघांच्या लग्नाचे संकेत दिले होते.

Kavya Anirudh Marriage : अनिरुद्ध-काव्या मारन गुपचूप करायचे डेट, फोटो झालेले व्हायरल, दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले?
kavya maran and anirudh ravichander marriage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 6:56 PM

Kavya Maran and Anirudh Marriage : प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाची मालकीण काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. कोट्यधीश काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. आयपीएलचे सामने सुरू झाले की हैदरबाद संघाचे सामने पाहण्यासाठी नेहमीच स्टेडियममध्ये हजेरी लावते. दरम्यान, आता अनिरुद्ध आणि काव्या मारन लवकरच लग्न करणार असल्याने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले? त्यांच्या प्रेमाला कधीपासून सुरूवात झाली तसेच ते एकमेकांना कधी डेट करत होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

काव्या-अनिरुद्ध लग्न करणार, कसं समजलं?

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर या दोघांनीही अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. परंतु हे दोघे एकमेकांना अगोदरपासूनच डेट करायचे असे म्हटले जात आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवथं रेड्डी यांनीच काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. काव्या मारन यांच्या कुटुंबीयांनी रेवंथ रेड्डी यांनी लग्नाला यावे यासाठी निमंत्रण पत्रिका दिली आहे. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची बातमी सगळीकडे पसरली आहे.

Loading...

एकमेकांना कधीपासून करायचे डेट?

काव्या मारन आणि अनिरुद्ध हे एकमेकांच्या प्रेमात नेमकं कधी पडले, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. परंतु ते दोघेही एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. यांच्या प्रेमाची आणि डेटिंगची पहिल्यांदा चर्चा जून 2025 साली झाली होती. तेव्हा रेडिट या समाजमाध्यमावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्न करणार आहेत, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर 2025 सालीच एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये दोघेही फिरत असताना दिसत होते.

लग्न कुठे होणार, रिसेप्शन कुठे?

दोघेही डेट करत असल्याचे समोर येताच तेव्हा अनिरुद्ध याने प्रतिक्रिया दिली होती. आम्ही लग्न करणार नाहीत. अफवा पसरवणे बंद करा, असे त्याने त्यावेळी सोशल मीडियावर सांगितले होते. अनिरुद्धच्या काकांनीच या वर्षी दोघांच्या लग्नाचे संकेत दिले होते. अनिरुद्धचे लग्न एका मोठ्या घरातील मुलीशी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आता अनिरुद्ध आणि काव्या यांचे लग्न ठरले असून 11 नोव्हेंबर रोजी ते ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. सोबतच 21 नोव्हेंबरमध्ये चेन्नईमध्ये ते रिसेप्शन ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us