Kavya Maran Wedding: लग्नाआधीच रजनीकांत यांच्या सुनेचा रॉयल कारभार? काव्या मारनच्या लग्नपत्रिकेवर सोने-चांदी…

Kavya Maran Wedding: काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही लग्न पत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Kavya Maran Wedding: लग्नाआधीच रजनीकांत यांच्या सुनेचा रॉयल कारभार? काव्या मारनच्या लग्नपत्रिकेवर सोने-चांदी...
Kavya Maran
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 4:23 PM

सोशल मीडियावर सध्या सनराइजर्स हैदराबाद (SRH)च्या मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या बातम्यांनी धूमाकूळ घातला आहे. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हे जोडपे ११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. याचदरम्यान एक अत्यंत लॅविश आणि गोल्ड-प्लेटेड वेडिंग कार्डही झपाट्याने व्हायरल होत आहे. पण हे कार्ड खरच त्यांच्या लग्नाचं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया व्हिडीओ मागिल सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेले सुपर लॅविश वेडिंग कार्ड

Loading...

इंटरनेटवर एक अत्यंत आलिशान वेडिंग कार्ड व्हायरल होत आहे, जे साउथ स्टार सूरज वेंजारामूडू उघडताना दिसत आहेत. गोल्ड प्लेटेड असलेल्या या बॉक्समध्ये चॉकलेट, ड्राय फ्रूट्स, मिठाई आणि मध्यभागी भगवान गणेशांची छोटी मूर्ती बसवलेली आहे. हे कार्ड कोणत्याही शाही भेटीसारखे दिसते.

काव्या-अनिरुद्ध यांच्या लग्नाचे कार्ड?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे सोने आणि चांदीन तयार करण्यात आलेले कार्ड काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाचे नाही. इंटरनेटवर चुकीची माहिती पसरवली जात आहे, कारण दोघांच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये कोणतेही सत्य नाही.

हे व्हायरल वेडिंग कार्ड कोणाचे आहे?

हे व्हायरल कार्ड खरे तर दुबईतील KRG (कन्नन रवि ग्रुप)चे संस्थापक आणि चेअरमन कन्नन रवि यांच्या मुलाचे दीपक रवि यांच्या लग्नाचे आहे. कन्नन रवि यांनी साउथ इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्सना हेच लक्झरी इन्व्हिटेशन पाठवले आहे, ज्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले होते.

दीपक रवि यांच्या लग्नाबाबत

कन्नन रवि यांच्या मुलाचे दीपक रवि यांचे लग्नाचे कार्यक्रम २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. त्यांची होणारी पत्नी सेंथमारई (Senthamarai) ही डीएमके संसद डीएम कथिर आनंद यांची मुलगी आहे. त्यांचा साखरपुडा याच वर्षी जुलैमध्ये झाला होता.

फॅन्सची उत्सुकता आणि करिअर अपडेट्स

काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाच्या बातम्या केवळ अफवा ठरल्या असल्या, तरी फॅन्स अजूनही दोघांना वर आणि वधूच्या लूकमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. करिअरच्या बाबतीत अनिरुद्ध आपल्या सुपरहिट म्युझिक कंपोझिशनमध्ये व्यस्त आहेत, तर काव्या आयपीएलमध्ये SRH फ्रँचायझी सांभाळत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us