KGF Chapter 2: ‘केजीएफ 2’मधील अभिनेते मोहन जुनेजा यांचं निधन; 100 हून चित्रपटांमध्ये केलं काम

| Updated on: May 07, 2022 | 3:54 PM

शंकर नाग यांच्या 'वॉल पोस्टर' चित्रपटातून त्यांनी अभिनयविश्वात पदार्पण केलं आणि त्यानंतर ते जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकले. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं.

KGF Chapter 2: केजीएफ 2मधील अभिनेते मोहन जुनेजा यांचं निधन; 100 हून चित्रपटांमध्ये केलं काम
Mohan Juneja
Follow us on

‘केजीएफ: चाप्टर 1’ आणि ‘केजीएफ: चाप्टर 2’मध्ये (KGF Chapter 2) भूमिका साकारलेले अभिनेते आणि कॉमेडियन मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. बेंगळुरूमधील (Bengaluru) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन हे मूळचे टुमकूर इथले होते. शंकर नाग यांच्या ‘वॉल पोस्टर’ चित्रपटातून त्यांनी अभिनयविश्वात पदार्पण केलं आणि त्यानंतर ते जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकले. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. विनोदी आणि खलनायकी या दोन्ही टोकाच्या भूमिका असल्या तरी दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी सहजरित्या पडद्यावर साकारल्या. ‘चेल्लाता’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. दर्शन, उपेंद्र, पुनीत राजकुमार, अंबरीश, शिवराजकुमार यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांनी काम केलं.

यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ 1’ आणि ‘केजीएफ 2’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटांसोबतच त्यांनी मालिकांमध्येही काम केलं होतं. वितारा या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. मोहन यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे सुद्धा वाचा

मोहन यांचा फोटो शेअर करत अभिनेते गणेश यांनी ‘ओम शांती’ असं ट्विटरवर लिहिलं. तर ‘आम्हाला तुमची खूप आठवण येईल सर’, अशा शब्दांत वशिष्ठ सिम्हा यांनी भावना व्यक्त केल्या. अनेक चाहत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.