AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF 2: रॉकीभाई जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले ‘केजीएफ 2’चे हक्क

थिएटरनंतर आता ओटीटीवरील प्रदर्शनासाठीही चुरस रंगली आहे. एक प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT platform) मोठी रक्कम देऊन या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचं कळतंय.

KGF 2: रॉकीभाई जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले 'केजीएफ 2'चे हक्क
KGF 2Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 10:09 AM
Share

कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF: Chapter 2) या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी ॲडव्हान्स बुकिंगचे आणि प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही दणक्यात कमाई केली आहे. अजूनही थिएटरमध्ये रॉकीभाईची क्रेझ पहायला मिळते. ईदच्या दिवशीही इतर बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत केजीएफ 2ने चांगला गल्ला जमवला होता. थिएटरनंतर आता ओटीटीवरील प्रदर्शनासाठीही चुरस रंगली आहे. एक प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT platform) मोठी रक्कम देऊन या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचं कळतंय. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, 27 मे नंतर हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होऊ शकेल. मात्र या तारखेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.

या ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल 320 कोटी रुपयांना केजीएफ 2चे हक्क विकत घेतल्याचं कळतंय. ओटीटीवरही यशचा हा चित्रपट व्ह्यूजचा विक्रम मोडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजूनही थिएटरमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 1000 कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. तसंच सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ला केजीएफ 2 ने मागे टाकलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ईदच्या दिवशी भारतात 9 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर अजय देवगणच्या ‘रनवे 34’ने 4 कोटी आणि टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ने 2.50 कोटी रुपयांची कमाई केली. केरळमध्येही केजीएफ 2 ची चांगली कमाई होतेय. या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि रवीना टंडन या कलाकारांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.