AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिजच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघात मोठी उलटापालट? सूर्यकुमार यादव घेणार तो निर्णय, कोणाला संधी…

टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा धमाका बघायला मिळतोय. मात्र, भारतीय क्रिकेट संघ संकटात आहे. भारताला 1 मार्चचा वेस्ट इंडिजसोबतचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. यादरम्यानच काही मोठे बदल होण्याचेही संकेत आहेत.

वेस्ट इंडिजच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघात मोठी उलटापालट? सूर्यकुमार यादव घेणार तो निर्णय, कोणाला संधी...
20 World Cup 2026 Indian Cricket Team
| Updated on: Feb 28, 2026 | 9:58 AM
Share

टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता करो या मरोच्या परिस्थितीमध्ये भारत आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारताला मोठा दणका बसला. पुढील दोन सामने भारताला जिंकल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यापैकी एक सामना भारताने जिंकला.आता खरी लढत भारतापुढे आहे. वेस्ट इंडिजसोबत भारताचा 1 मार्च 2026 रोजी सामना आहे. कोलकाता येथील ईंडन गार्डन्समध्ये 7 वाजता हा महामुकाबला रंगेल. हा सामना जिंकला की, थेट टिकट टू सेमीफायनलमध्ये जाण्याची मोठी संधी मिळेल. आता या सामन्यापूर्वी काही मोठे बदल संघात होतील, असे सांगितले जाते. गोलंदाजांमध्ये बदल होण्याचे संकेत आहेत. झिम्बाब्वे विरोधातील सामना जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादव याने चिंता व्यक्त केली होती.

शिवम दुबे याने 2 ओव्हर्समध्ये तब्बल 47 धावा दिल्या. वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांचाही गेम काही खास राहिला नाही. सध्याच्या परिस्थितीला टीम सेट असली तरीही काही बदल केले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. काही सामना तितका जास्त महत्वाचा आहे. तिलक वर्मा याने झिम्बाम्वे विरूद्धच्या सामनात 16 बॉलमध्ये 44 रन बनवून आल्या फॉर्मबद्दल संकेत दिले. अभिषेक,संजू सॅमसन यांच्या पार्टनरशिपने झिम्बाब्वे विरोधातील सामन्यात चांगले प्रदर्शन केले.

रिंकु सिंग, सुंदर वॉशिंग्टन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव प्लेइंग 11 च्या बाहेर आहेत. मात्र, वेळ पडली तर काही बदल होऊ शकतात. कारण भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचा आहे. संघ व्यवस्थापकांना संघात सध्याच्या स्थितीला कोणतेही बदल करण्याची इच्छा नसली तरीही काही निर्णय वेळेनुसार घेतले जाऊ शकतात. 11 चा संघ सध्या सेट आहे.

सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की, जर भारत वेस्ट इंडिज सामना जर पावसामुळे रद्द झाला तर नक्की काय समीकरण असणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना खेळला जावा हीच भारताची भूमिका असणार आहे. कारण जर पावसामुळे सामना झाला नाही तर याचा फटका थेट भारताला बसेल नेट रनरेटनुसार, वेस्ट इंडिज थेट सेमीफायनलमध्ये जाईल.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...