काय बोलाचा हेंका?? मंगळसूत्रावरून ट्रोल करणाऱ्यांना कोकण हार्टेड गर्लने सुनावलं, Video चर्चेत

Ankita Walawalkar Mangalsutra Trolling Konkan Hearted Girl Savage Reply : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर हिने मंगळसूत्र न घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमध्ये अंकिताने स्पष्ट केले की, ती नेहमीच मंगळसूत्र घालते. ट्रोलर्सच्या प्रश्नांना तिने बेधडक प्रत्युत्तर देत, 'काही घातलं तरी बायका बोलतात अन् नाही घातलं तरी बोलतात,' असं म्हणत महिलांच्या मानसिकतेवर बोट ठेवलं. तिच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.

काय बोलाचा हेंका?? मंगळसूत्रावरून ट्रोल करणाऱ्यांना कोकण हार्टेड गर्लने सुनावलं, Video चर्चेत
| Updated on: Sep 28, 2026 | 6:21 PM

बिग बॉस मराठी मध्ये झळकलेली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता प्रभू वालावलकर ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असते. तिचं नवं काम, प्रोजेक्ट्स हे ती बऱ्याच वेळेस चाहत्यांसोबत शेअर करत असते. अंकिता ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिला मंगळसूत्रावरून ट्रोल करण्यात आलं होतं. गळ्यात मंगळसूत्र न दिसल्याने तिला बरंच काही उलट सुलट सुनावण्यात आलं. मात्र त्यावर मौन ना बाळगता अंकिताने ट्रोलर्ससाठी एका खास व्हिडीओ तयार केला असून त्यांना त्यांच्याच भाषेत, कळेल असं बेधडक उत्तर दिलं आहे. एवढंच नव्हे तर “काही घातलं तरी बायका बोलतात अन् नाही घातलं तरी बोलतात,” असं म्हणत तिने ट्रोलर्सना उपरोधिक टोलाही लगावला. काय म्हणाली अंकिता ?

ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं

Loading...

अंकिताने तिच्या इस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तिचा पती कुणालही दिसला आहे. मंगळसूत्रावरून बोलणाऱ्यांचा अंकिताने या व्हिडीओत खरपूस समाचार घेतला आहे. ‘ 16 फेब्रुवारी 2025, साधारण दीड वर्षापूर्वी माझं लग्न झालं. तेव्हापासून एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र नसेल. शूटिंगच्या वेळी कधीतरी वेगळे कपडे किंवा लूक करतो, तेव्हा परिस्थितीनुसार मी काहीतरी वेगळं घालते. पण त्याशिवाय माझ्या कायम मंगळसूत्र घातलेलं असतं. पण तरीही काही बायकांना ते दिसत नाही. त्या कमेंट करतात की, ‘हिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही, हिचं लग्न झालं आहे की नाही?’ अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या जातात.” असं अंकिताने सुरूवातील म्हटलं.

 

पुढे अंकिताने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, “ मला बंद गळ्याचे कपडे घालायला आवडतात. मग मी त्याचा गळा खाली करून मंगळसूत्र दिसेल, हे बघा असं दाखवू का? माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि मी ते किती जपून ठेवते, हे सगळ्यांना सांगत फिरू का?” असा थेट सवाल तिने ट्रोलर्सना विचारला. एवढंच नव्हे तर त्यानंतर अंकिताने तिच्या गळ्यात एकदम मोठ्ठं असं सोन्याचं मंगळसूत्र घातलं आणि “उद्यापासून मी हे असंच घालून फिरते, म्हणजे सगळ्यांना अगदी स्पष्टपणे दिसेल.” असं उपरोधिकपणे म्हटलं. ‘काही घातलं तरी बायका बोलतात आणि नाही घातलं तरी बायका बोलतात. कोणी काहीही घातले तरी बायका बोलणारच. बायका नको तिथेही बोलतच राहणार.’ असंही तिने या व्हिडीओमधून सुनावलं आहे. तिच्या या व्हिडीओची सध्या बरीच चर्चा असून अनेकांनी तिची पोस्ट आणि भूमिका लाईक केली आहे. त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अनेक नेटकऱ्यांनी अंकिताच्या व्हिडीओवर कमेंट करत तिची बाजू घेतली आहे आणि ट्रोल करणाऱ्यांनाही सुनावलं आहे. ‘ एक बाईचं बाईची दुश्मन असते’ -असं कमेंटमध्ये एकाने लिहीलं. ‘ नायतर काय… जीव नकोस करून सोडल्यानी हाय’- असंही आणखी एकाने लिहीलं. एवढंच नव्हे तर – ‘ These बायका needs to grow up 😂बाईच ही बाईची खरी दुश्मन असते 😢बायका बोलतालीच तू लक्ष नको देऊ ‘ – असा सल्लाही कमेंट करून एका नेटकऱ्याने अंकिताला दिला. ‘ तू मोठं मंगळसूत्र घातलं की म्हणणार काय बघ शो ऑफ करते… छोटं घातलं की म्हणणार केवढसं घातलं… या सडक्या बुद्धीच्या बायकांकडे लई लई वेळ असतो…’ अशीही कमेंट आणखी एकाने अंकिताच्या या व्हिडीओवर केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us