Koffee With Karan 9: करण जोहरच्या चॅटशोमध्ये दिसणार जान्हवी कपूर आणि वरुण धवन, अर्जुन कपूरही करणार धमाल
Koffee With Karan 9: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 9' या लोकप्रिय शोच्या पुढल्या भागाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच येमआऱ्या पुढल्या भागात जान्हवी कपूर, वरुण धवन आणि अर्जुन कपूर एकत्र दिसू शकतील.

Koffee With Karan 9: ‘कॉफी विथ करण ‘ या करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शोचा 9वा आणि शेवटचा सीझन या महिन्यात सुरू झाला. आत्तापर्यंत या शोचे 2 एपिसोड आलेत. पहिल्या भागात सलमान खान आणि करिश्मा कपूर तर दुसऱ्या भागात रशिमंका मंदाना आणि विजय देवरकोंडाआले होते. दोन्ही एपिसोड्स धमाल झाले. आता यो शोच्या पुढल्.या, तिसऱ्या भागाबद्दल मोठी रंजक अपडेच समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार, करण जोहरच्या या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये जान्हवी कपूर आणि वरुण धवन एकत्र सोफ्यावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे, या एपिसोडमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूरही सहभागी होणार आहे.
‘कॉफी विथ करण 9’ मध्ये दिसणार जान्हवी आणि वरुण
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यातील गोड-आंबट नातं आणि त्यांचं भाऊ-बहीण म्हणून असलेलं खास बॉन्डिंग प्रेक्षकांना आधीपासूनच माहीत आहे. यापूर्वी 2018 मध्ये ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सीझनमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. तो जान्हवीचा पाहुणी म्हणून या शोमधील पहिलाच एपिसोड होता. आता पुन्हा एकदा या दोघांचं खास भावंडांचं नातं शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे, जान्हवी कपूर आणि वरुण धवन हे दोघं पडद्यावरील त्यांच्या उत्तम केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात. दोघांनी ‘बवाल’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. याआधी दोघांनीही वेगवेगळ्या वेळी या शोमध्ये हजेरी लावली. मात्र, आता जान्हवी आणि वरुण पहिल्यांदाच एकत्र ‘कॉफी काउच’वर बसून करण जोहरच्या तिखट प्रश्नांना सामोरे जाणार आहेत.या तिघांची धमाकेदार जोडी शोमध्ये आल्यामुळे मस्ती, मजेशीर संवाद आणि अनेक खुलासे पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
कधी झाली शोची सुरूवात?
करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ पहिल्यांदा 19 नोव्हेंबर 2004 रोजी सुरू झाला होता. आता या शोचा नववा सीझन सुरू असून, हाच शोचा शेवटचा सीझन असल्याचं सांगितलं जात आहे. हा शेवटचा सीझन 14 ऑक्टोबर 2026 पासून जिओहॉटस्टारवर स्ट्रीम झाला. या सीझनमधील सर्व एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर हा सीझन आणि संपूर्ण शो अधिकृतपणे संपणार असल्याचं वृत्त आहे.