Sonali Bendre: ज्याने त्रास दिला त्यावर प्रेम कसं करु…! सोनाली बेंद्रेने का केलं इतकं मोठं वक्तव्य? जाणून बसेल धक्का

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सोनाली हिने मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे... 'ज्याने त्रास दिला त्यावर प्रेम कसं करु...! असं वक्तव्य सोनाली हिने केलं आहे... तर जाणून घ्या अभिनेत्री असं म्हणाली तरी का?

Sonali Bendre: ज्याने त्रास दिला त्यावर प्रेम कसं करु...! सोनाली बेंद्रेने का केलं इतकं मोठं वक्तव्य? जाणून बसेल धक्का
Sonali Bendre
| Updated on: Oct 13, 2026 | 12:32 PM

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन करत बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. एक काळ अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला. करियरच्या उच्च शिखरावर पोहोचण्यापर्यंत सोनालीने अनेक चढ-उतारांचा समना तर केला पण, एक काळ असं देखील आला जेव्हा सोनाली आणि तिच्या कुटुंबियांना सर्वकाही एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटलं. अशी वेळ तेव्हा आली, जेव्हा सोनाली हिला कळलं की, ती गंभीर आजार कॅन्सरच्या विळख्यात अडकली आहे. पण त्यावर देखील सोनालीने हार न मानता विजय मिळवला. दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने विचारलेल्या प्रश्नावर सोनालीने लक्षवेधी उत्तर दिलं. ज्याने आपल्याला त्रास दिला आणि त्यावर प्रेम करणं फार कठीण असतं… असं सोनाली कॅन्सरला उद्देशून म्हणाली,

माधुरी हिने सोनाली हिला विचारलं, जेव्हा तू कॅन्सरवर मात केलीस, तेव्हा आम्हाला एक खंबीर सोनाली पाहायला मिळाली. यावर सोनाली म्हणाली, ‘आपण सगळे म्हणतो की कॅन्सरवर मात केली. विनोदी अंदाजात, हसत खेळत आपण सर्वकाही बोलतो… पण त्यावेळी माझा हेतू कॅन्सरवर मात करण्याचा बिलकूल नव्हता. मला समजून घ्यायचं होतं, हे काय होत आहे आणि मी यातून काय शिकू शकते. खरं सांगायचं झालं तर, मी यातून खूप काही शिकले..’

Loading...

पुढे सोनाली म्हणाली, ‘आपण मात करतो असं म्हणतो ना, तेव्हा मला भांडल्यासारखं वाटतं, एक नकारात्मकता मला जाणवते. शेवटी ते आपलंच शरीर आहे. ज्या कॅन्सर सेल्स आहेत, त्या आपल्याच सेल्स आहे, अशात आपल्याच सेल्ससोबत आपण काय भांडणार… त्यामुळे माझं शरीर जसं होतं, तसं त्यावर मी प्रेम केलं. मी विचार केली जसं माझं शरीर आहे, तसं त्यावर प्रेम करेल … ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे, त्यावर प्रेम करणं फार कठीण असतं. पण मला असं वाटतं याचं गोष्टीने माझं काम सोपं केलं आणि माझा पुढचा प्रवास झाला.’ असं देखील सोनाली म्हणाली.

सांगायचं झालं तर, सोनालीने ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सोनाली आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us