‘नको ती कामं कशाला करता?’, रोड ट्रिपमध्ये पृथ्वीक प्रतापसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ पाहून नेटकरीही घाबरले

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील रहस्यमयी दृश्य पाहून नेटकरीही घाबरले आहेत. ती जागा कुठली आहे, तिथे नेमकं काय आहे, असा सवाल नेटकरी करत आहेत.

नको ती कामं कशाला करता?, रोड ट्रिपमध्ये पृथ्वीक प्रतापसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ पाहून नेटकरीही घाबरले
पृथ्वीक प्रताप
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 11:34 AM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या पृथ्वीकने नुकताच त्याच्या रोड ट्रिपचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, या प्रवासादरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका रहस्यमय घटनेमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पृथ्वीक त्याच्या मित्रासोबत रोड ट्रिपवर गेला होता. रात्रीच्या वेळी डोंगराळ परिसरातून आणि वाहत्या पाण्यातून त्यांचा प्रवास सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. याचवेळी त्याला काही अंतरावर आगीच्या ज्वाळा धगधगताना दिसतात. हे दृश्य पाहून पृथ्वीक कॅमेरा त्या दिशेने वळवतो आणि चाहत्यांना ते दाखवतो. मला या ठिकाणी काहीतरी दिसल्याचं सांगत तो त्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतो. सुरुवातीला हा प्रकार केवळ कुतूहल म्हणून सुरू झालेला दिसतो; मात्र पुढे परिस्थिती वेगळीच होते.

समोर जे काही दिसतंय, ते नेमकं काय आहे, आगीच्या ज्वाळा नेमक्या कुठून येत आहेत, हे पाहण्यासाठी पृथ्वीक आणि त्याचा मित्र पुढे जातात. या प्रवासात त्यांना नदीतून वाट काढावी लागते. परिसरात अंधार असल्याने त्यांचा प्रवास आणखी थरारक वाटत आहे. व्हिडीओमध्ये पृथ्वीक हा रस्ता असल्याचं सांगत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, ते त्या रहस्यमय ठिकाणाच्या जवळ पोहोचताच अचानक दोघेही मागे फिरताना आणि तिथून पळताना दिसतात. त्यांना तिथे नेमकं काय दिसलं, याचा खुलासा पृथ्वीकने केलेला नाही.

Loading...

पहा व्हिडीओ-

पृथ्वीकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकरीही विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, असा प्रश्न विचारला आहे. ‘नेमकं काय होतं तिकडे?’, ‘ही जागा कुठली आहे?’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. नको ती कामं कशाला करता, अशीही टीका एका युजरने केली आहे. एका चाहतीने हा व्हिडीओ पाहताना आपल्यालाही भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पृथ्वीकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

पृथ्वीक आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी काहीतरी पाहिल्यानंतर तिथून परतले. मात्र, त्यांनी नेमकं काय पाहिलं किंवा अचानक पळण्यामागचं कारण काय होतं, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पृथ्वीक पुढील पोस्टमध्ये या रोड ट्रिपमधील त्या रहस्यमय घटनेचा खुलासा करतो का, याकडे आता नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us