Gaurav More Wife : ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची पत्नी कोण ? मनोरंजन क्षेत्राशी खास नातं

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे विवाहबंधनात अडकला आहे. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरवने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकरसोबत लग्न केले. अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत या लग्नाची माहिती दिली. प्रियांका कारेकर स्वतः अभिनेत्री असून, तिने 'चूप'सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या नवदाम्पत्याने नवीन घरातही प्रवेश केला असून, सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

| Updated on: Apr 06, 2026 | 10:49 AM
1 / 7
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रत्येक घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे.  ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ नावाने ओळखल्या जामाऱ्या गौरव मोरेला  वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचं काम पुरेसं बोलंक आहे. महाराष्ट्रात त्याचे हजारो चाहते असून, काल म्हणजे रविवार 5 एप्रिलच्या दिवशी त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का मिळाला. गौरव मोरेचं लग्न झाल्याची बातमी समोर आली. अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने गौरव आणि त्याच्या पत्नीचा फोटो टाकत मि. अँड मिसेस मोरे अशी कॅप्शन दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.( All Photos :  Instgram)

2 / 7
गेल्या काही काळापासून नात्यात असलेल्या गौरव मोरेने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकरशी लग्न केलं असून त्यांनी अधिकृतरित्या बातमी शेअर केली नसली तरी ऋतुजाने शेअर केलेल्या फोटो गौरवच्या शेजारी असलेली प्रियांका मंगळसूत्र, हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा घालून दिसल्याने त्यांच्या लग्नाच्या बातमीवर एकाप्रकारे शिक्कामोर्तब झालं. गौरवच्या लग्नाच्या बातमीमुळे त्याचे चाहते खूपच आनंदात असून सर्वांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

3 / 7
मात्र गौरव मोरे याची पत्नी नेमकी कोण आहे , ती काय करते? हे जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे. गौरवच्या पत्नीचा नाव प्रियांका कारेकर असून ती देखील मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे. प्रियांका ही देखील अभिनेत्री असून ती अनेक वर्षांपासून सक्रिय आहे, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतही तिने काम केलं आहे.

4 / 7
प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासह 'चूप' याचिकत्रपटात प्रियांकाची भूमिका होती. डुलकीर सलमान आणि सनी देओलची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. प्रियांकाने तिच्या इन्स्टा वॉलवर आर. बल्की यांच्यासोबतच फोटोही पोस्ट करून तो पिन केला आहे.

5 / 7
करिअरची  शून्यापासून सुरुवात केलेल्या गौरव मोरेला ओळखत नाही, अशी व्यक्ती आज महाराष्ट्रात विरळच. त्याच्या या मेहनतीची, प्रयत्नांची प्रियांका साक्षीदार असून प्रत्येक टप्प्यावर ती गौरवसोबत उभी होती.

6 / 7
एवढंच नव्हे तर महाराष्ट्राची हास्यजत्रेतला कलाकारांशीही तिचं खास नातं आहे. गौरव मोरे जेव्हा त्यात काम करायचा, तेव्हा प्रियांकाने इतर कलाकारांसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

7 / 7
प्रियांका गौरवने काल नव्या घरातही प्रवेश केला असून त्यांनीही काही फोटो त्यांच्या स्टोरीवर शेअर केले आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी, आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी ऋुतुजा बागवेसह अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात.

Follow Us