Nana Patekar: ‘रात्री फोन वाजल्यानंतर चिडून उचलला अन्….’, नानांच्या निधनाची बातमी, भावूक होत महेश मांजरेकर म्हणाले…
Nana Patekar: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आता प्रत्येक जण त्यांच्याबद्दल खास आठवणी सांगत आहेत. अशात महेश मांजरेकर यांनी देखील नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

Nana Patekar: फक्त मराठीच नाही बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक वर्षा चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी सर्व चाहत्यांना रडवून गेले. अनेक कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली, तर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील नाना यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नाना सारखा माणूस या जगात होणे नाही… असं म्हणत महेश मांजरेकर भावूक झालं. शिवाय त्यांना नानांच्या निधनाबद्दल कसं कळलं. याबद्दल देखील सांगितलं…
महेश मांजरेकर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, ‘नाना पाटेकर या जगात नाहीत, हा विचारच इतका भयान आहे… खूप राग देखील आला असं कसं होऊ शकतं… नाना पाटेकर असं व्यक्तीमत्व होतं, असं वाटलं नव्हतं एक काळ येईल आणि नाना नसेल… फिट होता नाना…. 40 वर्षांची आमची मैत्री होती, जी ‘नटसम्राट’मुळे आणखी घट्ट झाली. नाना तू जाशील असं कधीच वाटलं नव्हतं…
मांजरेकर पुढे म्हणाले, ‘नाना, मेधाला कायम फोन करायचा तिची विचारपूस करायचा… याचं मेधाला वाईट वाटायचं… तो मेधाला कायम सरकार म्हणायचा, ‘सरकार कशा आहात…? तब्येत जपा, आहे मी होईल सगळ व्यवस्थीत…’ असं आठवड्यातून एकदा तरी फोन असायचा… मेधाची चौकशी करायला. एके दिवशी असंच भावूक होत म्हणाला, ‘सरकार सांगा त्याला कधी आम्हाला पण फोन करायला… बरं वाटले मला..’
नाना यांच्यासोबत बोलणं झालं नाही, म्हणून मांजरेकर म्हणाले, असं वाटतं की, मैत्रीला आपण फार गृहित धरतो. त्याच्या नाटकाच्या खाली एक वाक्य होतं, असा नट होणे नाही… त्यापेक्षा असा माणूस होणे नाही… त्याच्यासारखा माणूस मी पाहिलाच नव्हता… कोणता ओरडा केला नाही. स्वतः नाम फाउंडेशनची स्थापना केली. कोणाला त्रास असेल तर पहिला फोन नानाचा असायचा.. या जगात नाना सारखा माणूस नाही…’
कशी कळली नानांच्या निधनाची बातमी…
रात्री 12 वाजलेले, इंस्टावर त्याचा व्हिडीओ आलेला, त्यामध्ये नाना एका पुस्तकाच्या लेखकाबद्दल बोलत होता. एका नवीन लेखकाचं इतकं कौतुक केल्याचं पाहून महेश मांजरेकरांना अप्रूप वाटलं. ‘एका नव्या लेखकाचं तो कौतुक करत होता, माझ्या डोळ्यात पाणी आलं… असं वाटलं किती मोठ्या मनाचा माणूस आहे हा.. मी विचार केला सकाळी उठल्यावर त्याला फोन करेल. मी लंडनमध्ये होतो, तिकडे रात्रीचं 12 वाजलेले आणि भारतात पहाटेचे 4.30 झालेले. मी झोपलो आणि रात्री तीन वाजता मला अनेक फोन आले. शेवटी मी चिडून फोन उचलला आणि मला सांगितलं नाना गेले… नाना सारखा माणून या जगात परत कधीच होणे नाही.. नाना मी जिवंत असेपर्यंत तुला मिस करेल… असं देखील महेश मांजरेकर म्हणाले.