Mamta Kulkarni: भगव्या कपड्यात फिरणारी ममता कुलकर्णी आता वनपिसवर, स्टेजवर बोल्ड डान्स
Mamta Kulkarni: भारतात आल्यानंतर भगव्या कपड्यांमध्ये दिसणारी ममता कुलकर्णी हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर तिने बोल्ड डान्स केला आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने अनेक सिनेमा मध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ममता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. झगमगत्या विश्वाचा त्याग करत संन्यास स्वीकारला. अभिनेत्राने 24 वर्षे तपस्या केली आणि त्यानंतर ममता साध्वी होऊन भारतात परतली. अशा प्रकारे, शोबिज सोडलेल्या अभिनेत्रीचा जुना अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे, जो कधीकाळी 90 च्या दशकात स्क्रीनवर आणि इव्हेंटमध्ये पाहायला मिळायचा.
सांगायचं झालं तर, ममता कुलकर्णी शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी पिंक सीटी जयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात पोहोचली होता. हा विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये अभिनेत्रीने ‘करण अर्जुन’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ ते ‘घातक’ पर्यंतच्या गाण्यांवर जोरदार ठेका धरला. या इव्हेंटमधील ममताच्या डान्स व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीचा लूकही एकदम वेगळाच पाहायला मिळाला.
ममताचा डान्स चर्चेत आला आहे. पण शोबिज सोडल्यानंतर अभिनेत्रीला नेहमी भगव्या वस्त्रांत साध्वीच्या रूपात पाहिलं गेलं होतं, पण आता तिचा एक ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. तिच्या या लूकने आणि स्टेज परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केलं.
ममता कुलकर्णीचा विद्यार्थ्यांना मोठा सल्ला…
ममता कुलकर्णी राजस्थान येथील एका फिल्म फेस्टिवलमध्ये एक चीफ गेस्ट म्हणून आलेली. या दरम्यान तिने विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सल्ला देखील दिला. ममता म्हणाली, ‘जे काम आवडत असेल ते काम करण्यासाठी बिलकूल घाबरु नका… कारण नसताना कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत राहू नका… जे कोणतं काम कराल ते पूर्ण मनाने करा..’ असं देखील ममता म्हणाली.
जन्माष्टमीवर डान्स करण्यास ममताने दिलेला नकार…
ममता कुलकर्णी हिने जन्माष्टमीच्या निमित्ताने स्टेजवर ‘करण अर्जुन’ या सिनेमातील ‘राणा जी माफ करना’ या गाण्यावर डान्स करण्यास नकार दिला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. यादरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला तिच्या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स करण्याची विनंती केली गेली, तेव्हा तिने म्हटलं होतं, ‘ती ममता मरण पावली आहे.’ अशा परिस्थितीत, आता राजस्थानमधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये ममताचा हा वेगळा अंदाज आणि डान्स परफॉर्मन्स थक्क करणारा आहे.